डोक्यातील कोंड्यामुळे त्रस्त आहात? मग ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टिप्स नक्की ट्राय करा !

| Updated on: Mar 31, 2021 | 11:41 AM

हल्ली केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत असतो. केसगळती आणि केसांमधील कोंडाही एक समस्या सामान्यच झाली आहे.

डोक्यातील कोंड्यामुळे त्रस्त आहात? मग ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टिप्स नक्की ट्राय करा !
कोंड्याची समस्या
Follow us on

मुंबई : हल्ली केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत असतो. केसगळती आणि केसांमधील कोंडाही एक समस्या सामान्यच झाली आहे. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. यावर समस्यांवर घरच्या घरी काही मिश्रण एकत्र करून तुम्ही आयुर्वेदिक उपाय करू शकता. ज्यामुळे तुमचे केस चांगले आणि चमकदार होऊ शकतात. (Follow these tips to get rid of dandruff)

-लिंबाचा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावावा. 10 ते 15 मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार होतील आणि डोक्यातील कोंडा आणि खाजही दूर होण्यास मदत होईल.

-खोबरेल तेल केसांना मॉयश्चरायझ करण्याचे काम करते. खोबऱ्याचे तेल थोडसे कोमट करून त्याने डोक्याचा मसाज करावा. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल.

-एका कांद्याचा रस काढून, कापसाच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवर लावावा. त्यानंतर 20 मिनिटांनी केस धुवून टाकावे. त्यामुळे कोंड्याची समस्या नाहीशी होऊन, केसगळती रोखण्यास मदत होते.

-2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घेऊन, त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी केस धुवून टाका. बेकिंग सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.

-केसांखालच्या त्वचेवर कोमट ऑलिव्ह तेल लावल्याने केसांखालची स्कीन नरम पडते. यासाठी ऑलिव्ह तेल हातावर घेऊन हलक्या हातांनी डोक्यावरील त्वचेची मालीश करा. मालीश केल्यानंतर ऑलिव्ह तेल डोक्यावर काही तासांसाठी तसेच ठेवा. नंतर हर्बल शॅम्पूने केस धुवून घ्या.

-केसांची नियमित काळजी घेताना केसांची मालिशही करावी. केसांची मसाज केल्यानंतर हलक्या हेअर कंडिशनरने केस धुवावेत. पॅराबेन (paraben) आणि सल्फेट नसलेले हेअर कंडिशनर केसांच्या स्वास्थ्यासाठी चांगले मानले जातात. हे घटक नसलेले हेअर कंडिशनर वापरावेत. एका आठवड्यात दोन ते तीन वेळा केस धुवावेत.

संबंधित बातम्या : 

(Follow these tips to get rid of dandruff)