AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरच्या घरी चेहऱ्याला मिळवा पार्लरसारखा ग्लो, फक्त मध आणि हळदीच्या फेसपॅकमध्ये मिक्स करा ही एक गोष्टं

तुम्हाला घरच्या घरी जास्त त्रास आणि खर्च न करता चेहऱ्यावर सोनेरी चमक मिळवायची असेल, तर तुम्ही हा फेस पॅक लावू शकता. यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरातील फक्त तीन-चार साहित्याची गरज लागेल. चला तर मग या फेसपॅक बद्दल जाणून घेऊयात.

घरच्या घरी चेहऱ्याला मिळवा पार्लरसारखा ग्लो, फक्त मध आणि हळदीच्या फेसपॅकमध्ये मिक्स करा ही एक गोष्टं
honey termeric face packImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 14, 2026 | 10:45 PM
Share

बदलत्या वातावरणात जशी आरोग्याची काळजी घेतो तसेच त्वचेची काळजी घेण्याकडे आजकाल प्रत्येकजण लक्ष देत आहे. त्यात त्वचेची काळजी घेताना मात्र बहुतेकजण घरगुती उपायांना पहिले प्राधान्य देतं आहेत. अशातच त्वचेच्या काळजीसाठी कच्चं दूध आणि हळद त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे त्वचेच्या उपचारांसाठी फायदेशीर मानले जातात. त्यामुळे जर तुम्ही त्यांचा वापर करून फेस पॅक तयार केला तर तुम्हाला कमी खर्चात आणि कोणत्याही त्रासाशिवाय परिणाम देणारा एक उपाय आहे.

मध, कच्चं दूध आणि हळद एकत्र करून एक पॅक बनवा. हा पॅक विशेषतः कोरडी त्वचा किंवा निस्तेज कांती असलेल्यांसाठी खूप चांगला काम करतो. महिनाभर आठवड्यातून दोनदा नियमितपणे लावल्यास चेहऱ्यावर लक्षणीय चमक येऊ शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फेसपॅक कसा बनवायचा त्याचे फायदे जाणून घेऊयात.

हा पॅक अशा प्रकारे तयार करा

सर्वप्रथम तुम्हाला एका वाटीत थोडे मध घ्या. यानंतर त्यात अर्धा चमचा हळद टाका. त्यानंतर थोडे कच्चे दूध टाकून सर्व मिश्रण एकजीव करून फेसपॅक तयार करा. जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्ही मुलतानी माती आणि गुलाबपाणी देखील मिक्स करू शकता.

त्वचेला होणारे फायदे

  • मध त्वचेसाठी नैसर्गिक क्लीन्झर म्हणून काम करतो आणि चेहरा उजळ करतो.
  • हळदीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात आणि त्यामुळेच चेहऱ्याला सोनेरी चमक येते.
  • तर दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते.

याप्रमाणे त्वचेवर लावा फेसपॅक

तयार फेसपॅक तुमच्या कानाच्या मागे थोडंस लावून पॅच टेस्ट करा. तुम्हाला ॲलर्जी नसल्यासच ते चेहऱ्यावर लावा. कोणतीही पेस्ट थेट त्वचेवर कधीही लावू नका. कानाच्या मागे लावल्यानंतर 10 मिनिटे थांबा, स्वच्छ धुवा आणि काही त्रास न झाल्यास चेहऱ्यावर लावा.

ही पेस्ट लावल्यानंतर ती किमान 15 ते 20 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर एक चांगले मॉइश्चरायझर लावा आणि त्यानंतर लगेचच सनस्क्रीन लावा. या दोन स्टेप करायला विसरू नका. तुम्ही ही पेस्ट आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता. याचे सहसा कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

या पेस्टचा फायदा असा आहे की तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये न जाता चेहऱ्यावर सोनेरी चमक मिळवू शकता . तुमच्या लक्षात येईल की तुमच्या त्वचेचा रंग हळूहळू सुधारत आहे, त्वचा स्वच्छ होत आहे आणि डाग कमी होत आहेत. गरजेनुसार तुम्ही ही पेस्ट तुमच्या मानेवर आणि गळ्यावरही वापरू शकता. लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा, ती सुकू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार