AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना फिरायला घेऊन जायचंय? ‘या’ 7 सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या

उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्यावर आपल्यापैकी अनेकजण कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. जर तुम्ही कुटुंबासोबत खास करून तुमच्या मुलांसाठी योग्य ठिकाण शोधत असाल तर नॉर्थ ईस्ट इंडियातील ही सात ठिकाणं एक्सप्लोर करू शकता.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना फिरायला घेऊन जायचंय? 'या' 7 सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या
TravelImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 12, 2026 | 11:43 AM
Share

लहान मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहतात. कारण् शाळांना सुट्ट्या लागताच बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन करू लागतात. बहुतेक लोकं आल्हाददायक हवामान, हिरवीगार निसर्गरम्यता आणि कुटुंबासोबत निवांत क्षण घालवण्यासाठी शांत ठिकाणांच्या शोधात असतात. जर तुम्ही या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसोबत फिरायला जाण्याचा करत असाल, तर नॉर्थ ईस्ट इंडियामधील ही सात सुंदर ठिकाणे उत्तम पर्याय ठरू शकतात. येथील थंड हवामान, नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण तुमची सुट्टी अविस्मरणीय बनवेल.

1- शिलाँग:

या उन्हाळ्यात तुमच्या मुलांना मेघालयाची राजधानी शिलाँगला घेऊन जा. शिलाँगला ‘स्कॉटलंड ऑफ द ईस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येथील हवामान अत्यंत आल्हाददायक असते. तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत एलिफंट फॉल्स, उमियाम तलाव आणि आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता. येथे तुम्ही निसर्गरम्य वातावरणात काही निवांत क्षण घालवू शकता.

2. चेरापुंजी

मेघालयामध्ये वसलेले चेरापुंजी, येथील हिरवीगार वनराई, ढगांनी वेढलेले डोंगर आणि लिविंग रूट ब्रिजसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात येथील हवामान फार उष्ण किंवा फार थंड नसते. त्यामुळे मुलांना फिरायला घेऊन जाण्याकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे.

3. तवांग

अरुणाचल प्रदेशातील तवांग हे त्याच्या सुंदर दऱ्या आणि पर्वतांसाठी ओळखले जाते. उन्हाळ्यात कुटुंबासोबत भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथील बर्फाच्छादित पर्वत, मठ आणि सुंदर तलाव हे पर्यटकांना सर्वांना मोहित करतात.

4.गंगटोक

सिक्कीमची राजधानी गंगटोक येथून तुम्ही कांचनजंगाच्या भव्य दृश्यांचा सहज आनंद घेऊ शकता. येथील हिरवीगार जंगले, मॉडर्न कॅफे आणि सूर्योदय पाहण्याची ठिकाणे हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.

5. पेलिंग

पेलिंग हे सिक्कीममधील सर्वात सुंदर थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे, येथील निसर्गरम्य दऱ्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. येथून तुम्ही कांचनजुंगा शिखराची भव्य दृश्ये पाहू शकता. हे ठिकाण येथील शांत वातावरण आणि विस्मयकारक पर्वतीय दृश्यांसाठी ओळखले जाते.

6.काझीरंगा

मुलांना प्राणीसंग्रहालयाला भेट द्यायला आणि विविध प्रकारचे प्राणी पाहायला खूप आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊ शकता. सफारीदरम्यान तुम्हाला अनेक दुर्मिळ प्राणी दिसू शकतात.

7. मिझोरामची राजधानी आयझॉल

टेकड्यांनी वेढलेले एक शांत शहर आहे. नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले आयझॉल हे ठिकाणं उन्हाळ्याच्या महिन्यांत आपल्या मुलांसोबत भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा