AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काकडी, लिंबू, पालक आणि लसणाचा ज्यूस अत्यंत फायदेशीर, वाचा !

सध्याच्या कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काकडी, लिंबू, पालक आणि लसणाचा ज्यूस अत्यंत फायदेशीर, वाचा !
ग्रीन ज्यूस
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 06, 2021 | 8:01 AM
Share

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनाच काय दुसरा कोणताही आजार आपल्याला होऊ शकत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. (Green juice is beneficial for boosting the immune system)

यासाठी आपल्याला  लिंबू, हिरवी कोबी, हिरवे सफरचंद, काकडी, हिरव्या भाज्या, आले, पालक, टोमॅटो, बीट, लसूण, कारले यापैकी कोणत्याही चार-पाच गोष्टी लागणार आहेत. रस बनवण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी बारीक चिरून घ्या आणि गरजेनुसार त्यात पाणी टाकून, मिक्सरच्या मदतीने ‘हेल्थी ज्यूस’ तयार करा. कारले, हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, पालक,  टोमॅटो आणि लसूण यासारख्या निरोगी वस्तूंपासून बनवलेले हा रस व्हिटामिन-ए, व्हिटामिन-सी, व्हिटामिन-के आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध, हा ‘ग्रीन ज्यूस’ आपल्याला अनेक हानिकारक आजारांपासून वाचवतो. त्याच वेळी, हा रस आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवतो आणि दिवसभर आपली ऊर्जा देखील वाढवतो. याचबरोबर शरीरात चयापचय क्रिया देखील सुरळीत करतो. हा ज्यूस आपण दिवसातून एकदातरी घेतला पाहिजे. कारले आणि बीट आपले रक्त शुद्ध करते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या रसातील कारले आणि बीट याशिवाय हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, आले, लसूण आणि टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आहेत.

वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. आपल्या दिवसाची सुरुवात हिरव्या पालेभाजीच्या सुपने केली पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

(Green juice is beneficial for boosting the immune system)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल