
पावसाळा येताच वातावरणात ताजेपणा जाणवतो, पण या ऋतूत सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे असते. कारण या दिवसांमध्ये आजारांचा सर्वाधिक धोका असतो, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे केसांची समस्या. खरंतर घराबाहेर पडल्यावर केस ओेले होतात. त्यामुळे पावसाळ्यात केस ओले झाल्याने चिकट आणि कोरडे होतात. त्याच वेळी केसांशी संबंधित अनेक समस्या देखील सतावू लागतात. पावसाळ्यात हवेत जास्त ओलावा असतो, ज्यामुळे टाळू तेलकट होते, त्यामुळे केसांमधून तेल निघू लागते आणि केस चिकट होतात. बऱ्याचदा, शाम्पू केल्यानंतर काही तासांनीच केस पुन्हा चिकट आणि फ्रिजी होतात.
अशातच कार्यक्रमात जाताना महिलांना पावसाळ्यात केसांना स्टाईल करणे थोडे कठीण होते. जर तुम्हालाही ही समस्या भेडसावत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला 10 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस पुन्हा मऊ, स्वच्छ आणि चमकदार होतील. चला त्यांचे फायदे आणि त्यांचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊयात.
लिंबू वापरा
केसांमधील चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबू हा एक उत्तम पर्याय आहे. लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते जे केवळ स्कॅल्प खोलवर स्वच्छ करत नाही तर डोक्यातील कोंडा आणि चिकटपणा देखील दूर करते. यासाठी, एक वाटी पाण्यात अर्ध्या ते एका लिंबाचा रस मिक्स करा. आता हे पाणी तुम्ही केसांना शॅम्पू केल्यानंतर या लिंबाच्या पाण्याचा मदतीने पुन्हा केस धुवा. ते स्कॅल्पवरील अतिरिक्त घाण आणि तेल काढले जातात. ज्यामुळे केस स्वच्छ आणि मऊ करते.
दही हा देखील एक चांगला पर्याय आहे
केस मऊ करण्यासाठी दही खूप चांगला पर्याय आहे. दह्यामध्ये असलेले प्रथिने, लॅक्टिक ॲसिड आणि नैसर्गिक फॅट केसांना खोलवर पोषण देतात, त्यामुळे केस मऊ होतात आणि स्कॅल्पला थंड ठेवतात. यासाठी, तुम्ही दह्याचा मास्क बनवू शकता. तर हा हेअर मास्क तयार करण्यासाठी 4-5 चमचे दही घ्या. ते थेट स्कॅल्पवर आणि केसांच्या लांबीवर लावा. 20-30 मिनिटा नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.
अंड्याचा पिवळा भाग वापरा
अंड्यामधील पिवळा भाग पावसाळ्यात केसांना मऊ बनवू शकतो. अंड्यामधील पिवळा भाग प्रथिनेने समृद्ध असतो, जो केसांना प्रथिने प्रदान करतो. तर हे केसांना लावण्यासाठी तुमच्या केसांच्या लांबीनुसार 1 किंवा 2 अंडी घ्या आणि अंड्याचा पिवळा भाग वेगळा करा. ते फेटून तुमच्या सर्व केसांना लावा. 15-20 मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. यामुळे केस मऊ आणि मजबूत होतात.
अळशी बियाणे जेल
अळशीच्या बिया देखील केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. केसांना मजबूत करण्यासोबतच ते त्यांचा पोत सुधारतात आणि केसांना मऊ आणि चमकदार बनवतात. अळशीच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेच ओमेगा-३, जीवनसत्त्वे आणि फॅटी ॲसिड असतात. केसांच्या वाढीसाठी देखील ते खूप चांगले आहे. यासाठी, फक्त अळशीच्या बिया घ्या आणि पाण्यात जेल स्वरूपात होईपर्यंत उकळवा. यानंतर तयार झालेले जेल गाळणीच्या किंवा कापडाने वेगळे करा. थंड झाल्यावर अळशीच्या बियांचे हे जेल पाणी संपूर्ण केसांवर लावा. काही वेळाने शॅम्पून केस धुवा. तुम्हाला स्वतः परिणाम दिसेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)