Hair Care | केसांना ‘तेल मालिश’ करताय? थांबा, आधी जाणून घ्या तुमच्या केसांसाठी कोणते तेल योग्य…

केसांच्या आरोग्यासाठी नियमितपणे त्यांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे.

Hair Care | केसांना ‘तेल मालिश’ करताय? थांबा, आधी जाणून घ्या तुमच्या केसांसाठी कोणते तेल योग्य...
सुंदर केस

मुंबई : केसांच्या आरोग्यासाठी नियमितपणे त्यांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. परंतु, जेव्हा आपण आपल्या केसांसाठी योग्य तेलाची निवड करता, केवळ तेव्हाच केसांची योग्य वाढ होणे शक्य असते. बाजारात अनेक प्रकारची तेलं उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत आपण कोणतेही तेल जाहिरात पाहून वापरण्यास करतो आणि काही फायदा होत नसल्यास आपण ते त्वरित बदलतो. या प्रकारचा प्रयोग केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत नाही तर आणखी हानिकारक ठरू शकतो. जर, तुम्हाला खरोखर आपले केस चमकदार, मजबूत आणि दाट बनवायचे असतील तर, केसांचा पोत लक्षात घेऊन, गरजेनुसार योग्य तेलाची निवड करा (Hair Care Tips know which oil is best for your hair).

केस गळती रोखण्यासाठी

जर, आपल्या केसांत कोंड्याची समस्या उद्भवली असेल, तर त्यामुळे आपले केस गळू लागतात किंवा केस तुटू लागतात. या समस्येवर खोबरेल तेल अतिशय उपयुक्त ठरते. शुद्ध खोबरेल तेलाने हलक्या हातांनी दररोज केसांना मसाज करा. यामुळे आपले केस मजबूत आणि दाट होतीलच, तसेच कोंड्याच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.

सेन्सिटिव्ह केसांसाठी

सेन्सिटिव्ह केसांसाठी ऑलिव्ह ऑईल अतिशय गुणकारी ठरते. हे तेलाबरोबरच केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून देखील काम करते. ऑलिव्ह ऑईलमुळे केस मजबूत होतात आणि केस फाटे फुटण्याच्या समस्येपासून मुक्त होतात. शक्यतो रात्रीच्या वेळेस केसांवर ऑलिव्ह ऑईल लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी शॅम्पूने आपले डोके धुवा (Hair Care Tips know which oil is best for your hair).

कुरळ्या केसांसाठी

कुरळे केस खूप लवकर कोरडे होऊ लागतात. त्यांना योग्य पोषण देण्यासाठी, अशा तेलांची आवश्यकता आहे ज्याचा दीर्घकाळ प्रभाव राहू शकतो. एरंडेल तेल कुरळ्या केसांसाठी खूप चांगले मानले जाते. त्यात व्हिटामिन ई, खनिजे आणि बरीच प्रथिने असतात. यामुळे केस निरोगी राहतात आणि केसांची वाढ होते.

केसांच्या वाढीसाठी

आपण आपल्या केसांची वाढ सुधारू इच्छित असाल, तर बदाम तेल एक चांगला पर्याय आहे. किमान तीन महिने नियमित बदाम तेलाने केसांना मालिश करा. यामुळे केस खूप लांबसडक होतील.

केस अधिक काळे आणि मजबूत करण्यासाठी

हजारो वर्षांपासून आवळ्याचे अर्थात आमला तेल वापरले जाते. या तेलामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होतात. परंतु, जर आपल्या केसांत खाज सुटण्याची समस्या असेल किंवा आपल्या केसांमध्ये जास्त कोरडेपणा असेल, तर आमला तेल हानिकारक ठरू शकते. अशा लोकांनी आवळ्याच्या तेलाचा वापर टाळावा.

(Hair Care Tips know which oil is best for your hair)

हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI