Happiness | एकट्या राहूनही महिला होऊ शकतात आनंदी, अवलंबवा ‘ या ‘ टिप्स !

Happiness | बऱ्याच लोकांना केवळ एकटं रहायला आवडतं. पण एकटं राहिल्यावर काही दिवसांनी नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. अशा वेळी या सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही आनंदी राहू शकता.

Happiness | एकट्या राहूनही महिला होऊ शकतात आनंदी, अवलंबवा ' या ' टिप्स !
हे गुण बनवा मित्रImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 10:34 AM

Happiness | प्रत्येक माणसाची जीवन जगण्याची (Life) पद्धत वेगळी असते. त्यांचे स्वत:चे काही निर्णय, काही चॉईस असतात. काही लोकांना कुटुंबासोबत एकत्र रहायला आवडतं तर काहींना एकटेपणा (Living Alone) जास्त प्रिय असतो. मात्र, काही लोकांसाठी एकटं राहणं जास्त आव्हानात्मक असते.  त्यासाठी जीवनशैलीत थोडा बदल करावा लागेल.

एकट राहूनही आनंदी

बऱ्याच वेळेस आपण एकटं राहण्याचा निर्णय तर घेतो, मात्र त्यानंतर आपल मन लागत नाही आणि उदास (sad feeling) वाटू लागतं. पण जर तुम्हाला एकटंच राहणं आवडत असेल तर इथे दिलेल्या काही सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही एकटेही खुश राहू शकता. साधी, सिंपल लाईफस्टाईल (Lifestyle) असतानाही तुम्ही आनंदी राहणं शिकू शकता. एकटं राहताना नकारात्क विचार न येण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता, जाणून घेऊया.

रोज डायरी लिहा

तुम्ही एकट्या रहात असाल आणि तुमच्या मनात अनेक विचारांची गर्दी होत असेल तर तुम्ही ते विचार एखाद्या डायरीत नोंदवून ठेवू शकता. अनेक वेळा एकटं राहिल्यावर लोकांच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात. कधी ते चांगले असतील पण कधीतरी नकारात्मक विचारही मनात येतात. अशा वेळी रोज डायरी लिहीणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

हे सुद्धा वाचा

बदल गरजेचा

तुमच्या कंटाळवाण्या रुटीनपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला थोड्या चेंजची किंवा बदलाची गरज असते. रोज-रोज तीच दिनचर्या, तीच कामं, रुटीन फॉलो करून आपल्याला कंटाळा येतो, उदास वाटतं. अशा वेळी तुम्ही बदल म्हणून घर सजवू शकता, किंवा नवी हेअर स्टाईल करू शकता. काही नव्या गोष्टी ट्राय करून तुम्ही कंटाळा येण्यापासून रोखू शकता.

बनवा चांगले मित्र

मित्र हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मित्र महत्वाचे असतात. सुख असो किंवा दु:ख, कोणतीही गोष्ट मित्रांसोबत शेअर करता येते. त्यामुळे तुम्ही जर एकटे रहात असाल तर चांगले मित्र बनवा आणि त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांच्यासोबत वेळ घालवून, थोडी मजा करून तुम्ही तुमचा मूड ठीक करू शकता.

करीअर वर लक्ष केंद्रीत करा

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सिंगल असाल तर स्वत:ला प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या कामावर, करिअरवर फोकस करा. जीवनात पुढे जाणं खूप महत्वाचं असतं. करीअरवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही नकारात्मक विचांरापासून दूर राहू शकता. तुमच्यामध्ये संयम राहतो. त्याशिवाय तुम्ही मेडिटेशन, योगासने आणि एखादा खेळ खेळूनही आनंदी राहू शकता.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.