AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food | जिऱ्यात लपलेत अनेक औषधी गुणधर्म, ‘या’ प्रकारे करा सेवन

जिरे घाव आणि जखमांवर अँटीसेप्टिक म्हणून काम करतो. याचे नियमित सेवन केल्याने आपली पाचन क्रिया खूप मजबूत होते.

Food | जिऱ्यात लपलेत अनेक औषधी गुणधर्म, ‘या’ प्रकारे करा सेवन
जिऱ्यात लपलेत अनेक औषधी गुणधर्म
| Updated on: Feb 08, 2021 | 4:52 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या काळात अनेकांनी स्वत: ला फिट ठेवण्यासाठी योग, व्यायाम आणि एरोबिक्सचे अनेक प्रकार केले. यावेळी, लोकांचे प्रथम प्राधान्य दिले ते निरोगी रहाण्याला! आणि त्यासाठी त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे होते. या काळात जर कुणी आजारी पडले असेल, तर त्यालाच सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. यातच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपले डॉक्टर आणि इतर तज्ज्ञ मंडळी आपल्याला अनेक सल्ले देत होते (Health Benefits of cumin water).

या काळात रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आपण व्हिटॅमिन-सी समृद्ध पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यासह व्यायाम देखील खूप महत्वाचा आहे. जर आपली रोगप्रतिकारक यंत्रणा कायम राहिली, तर ती तुम्हाला इतर रोग होऊ देत नाही. अशावेळी कुठल्याही आजाराचा धोका नेहमीच कमी होतो. तुम्हालाही तुमची रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवायची असेल, तर तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. वजन कमी करण्यासाठी लोक जिरे-पाण्याचे सेवन करतात. चला तर, त्याबद्दल संशोधन आणि संशोधक काय म्हणतात ते जाणून घेऊया…

जिऱ्याचे फायदे

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात जिऱ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. जिरे घाव आणि जखमांवर अँटीसेप्टिक म्हणून काम करतो. याचे नियमित सेवन केल्याने आपली पाचन क्रिया खूप मजबूत होते. तसेच, शरीरात असलेले टॉक्सिक काढून टाकले जातात. यात अनेक अँटीकार्सीनोजेनिक गुणधर्म आहेत, जे पोट आणि यकृतामधील ट्यूमरचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहेत. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती बरीच मजबूत होते. या संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की, जिऱ्याचे सेवन केल्यास लघवीचे प्रमाणही वाढते आणि मूत्रपिंड साफ राहते (Health Benefits of cumin water).

जिरे कसे वापरावे?

आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करायची असल्यास, दररोज रात्री झोपेच्या आधी अर्धा चमचे जिरे एका ग्लास पाण्यात घाला. दुसर्‍या दिवशी सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या आणि संपूर्ण जीरे चघळा आणि नंतर ते चावून खा. जिरे पाणी पिण्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती बरीच मजबूत होते. जिऱ्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्या सेवनामुळे तुमच्या शरीरावरील अतिरिक्त चरबी देखील नष्ट होते. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते.

या लोकांनी जिऱ्याचे सेवन टाळावे!

प्रत्येक गोष्टीचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्याचे सेवन संतुलित प्रमाणात केले जाते. पण जिऱ्याचे फायदे जाणून घेतले असतीलच, पण अति प्रमाणात जिऱ्याचे सेवन केल्यास शरीरावर याचा वाईट प्रभाव देखील पडू शकतो.

– गर्भवती महिलांनी जिऱ्याचे सेवन कमी करावे अथवा टाळावे. जिऱ्याचे जास्त सेवन केल्यास ते गर्भपात होण्याचे कारण बनू शकते.

– मासिक पाळीच्या काळात जिऱ्याचे सेवन कमी करावे, कारण जिऱ्यामुळे जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

– काहींना जिऱ्याची अॅलर्जीही असू शकते.

– जास्त प्रमाणात जिऱ्याचा वापर केल्यास किडनी आणि लिव्हरला त्रास होऊ शकतो.

– जिरे हे वातूड असल्यामुळे सेवन केल्यानंतर जास्त ढेकर येऊ शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of cumin water)

हेही वाचा :

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...