Giloy | कर्करोगापासून मधुमेहापर्यंतच्या समस्यांवर गुणकारी ‘गिलॉय’चे सेवन आरोग्यासाठी लाभदायी!

कोरोना कालावधीत रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींची मागणी वाढली आहे. यात अग्रक्रमांकावर ‘गिलॉय’ या वनस्पतीचे नाव आहे.

Giloy | कर्करोगापासून मधुमेहापर्यंतच्या समस्यांवर गुणकारी ‘गिलॉय’चे सेवन आरोग्यासाठी लाभदायी!
गिलोयचे तोटे

मुंबई : कोरोना कालावधीत रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींची मागणी वाढली आहे. यात अग्रक्रमांकावर ‘गिलॉय’ या वनस्पतीचे नाव आहे. गिलॉय वजन कमी करणे, त्वचेच्या समस्या आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गिलॉयचा उपयोग व्हायरल इन्फेक्शन दूर करण्यासाठी देखील केला जातो. चवीला कडू असणारा ‘गिलॉय’ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. गिलॉयमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत (Health Benefits of Giloy).

गिलॉय अनेक रोग बरे करण्यास मदत करतो. गिलॉय या वनस्पतीला ‘अमृता’ म्हणूनही ओळखले जाते. आयुर्वेदानुसार, गिलॉय हे अमृताचे मूळ असल्याचे म्हटले जाते, ज्यात आयुर्वेदाचे समृद्ध गुणधर्म आहेत. आपणही गिलॉयचे सेवन करू इच्छित असल्यास, रस, कॅप्सूल आणि पावडर स्वरुपात ‘गिलॉय’ वापरू शकता. चला तर, गिलॉयच्या या फायद्यांविषयी जाणून घेऊया…

ताप कमी होतो

जर, कुठलेही औषध न घेता नैसर्गिकरित्या ताप बरा करायचा असेल, तर गिलॉय इतका चांगला दुसरा उपाय नाही. गिलॉय शरीराचे तापमान कमी करण्यात मदत करते, असा आयुर्वेद आणि वैद्यकीय विज्ञानाचा विश्वास आहे. याव्यतिरिक्त, गिलॉयमध्ये अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. आयुर्वेदानुसार, गिलॉय शरीरातून हानिकारक घटक काढून टाकतो आणि पाचन शक्ती मजबूत करण्यास मदत करतो. ताप आणि संसर्गजन्य आजरांतून बरे होण्यासाठी दिवसातून दोनदा गिलॉय रस प्यावा (Health Benefits of Giloy).

अँटी कॅन्सर एजंट

गिलोयमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. एका अभ्यासात असा दावा केला गेला आहे की, गिलॉय एंटी-कॅन्सर एजंट म्हणून काम करतो. एम्सच्या पथदर्शी अभ्यासानुसार असे आढळले आहे की, कर्करोगाच्या रुग्णांसाठी गिलॉयचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. विशेषतः जे रुग्ण केमोथेरपी घेत आहेत, त्यांच्यासाठी गिलॉय फायदेशीर ठरू शकते.

रक्तातील साखर नियंत्रित करतो.

आपल्याला मधुमेहाची समस्या असल्यास गिलॉयचे नियमित सेवन केले पाहिजे. गिलॉयमध्ये हायपोग्लाइसेमिक गुणधर्म आहेत, जे टाईप 2 मधुमेह बरा करण्यास मदत करतात. गिलॉय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो. गिलॉयचे रोज सेवन केल्यास लठ्ठपणा आणि अकाली वृद्धत्वाची समस्या देखील कमी होते.

गिलॉय डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतो. यासाठी दररोज गिलॉय पाण्यात टाकून, कापसाच्या साहाय्याने डोळ्यांच्या पापण्यांवर लावा. याव्यतिरिक्त, गिलॉय चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करतो.

(Health Benefits of Giloy)

(टीप : कुठल्याही उपचारपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI