AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pudina Benefits | आरोग्यवर्धक गुणांचा खजिना ‘पुदीना’, ‘या’ आजारांवर ठरेल गुणकारी!

पुदीना ही एक अशी वनस्पती आहे, जी सामान्यतः स्वयंपाकघरात चटणी बनवण्यासाठी म्हणून वापरली जाते. पुदीन्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे.

Pudina Benefits | आरोग्यवर्धक गुणांचा खजिना ‘पुदीना’, ‘या’ आजारांवर ठरेल गुणकारी!
पुदीना
| Updated on: Mar 01, 2021 | 10:37 AM
Share

मुंबई : पुदीना ही एक अशी वनस्पती आहे, जी सामान्यतः स्वयंपाकघरात चटणी बनवण्यासाठी म्हणून वापरली जाते. पुदीन्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे. यासह, हे पोटात होणार्‍या बर्‍याच समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. परंतु, पुदीना वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आज आपण पुदीनाच्या पानांच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. तसे, आपण याचा योग्य वापर कसा करू शकतो, हे देखील जाणून घेऊया…(Health benefits of mint aka pudina)

पुदीन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटामिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे आणि लोह आढळतात. या पानांच्या सेवनाने उलट्या रोखता येतात आणि पोटातील गॅस देखील काढून टाकता येतो. तसेच, साठलेल्या कफावर देखील पुदिना उपयुक्त आहे. कारण, पुदीना गरम प्रभावाचा आहे, ज्यामुळे तो शरीरातून घाम काढून ताप काढून टाकतो. आपल्याला एखादा किडा चावल्यास, त्याचे विष काढून करण्याचे गुणधर्म देखील पुदीन्यामध्ये आहेत.

पुदीना चटणी खूप उपयुक्त

सहसा आपण चटणीचा स्वाद वाढवण्यासाठी पुदीना वापरतो. पुदीना चटणी देखील शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. पुदीन्यामध्ये डाळिंब, हिरव्या कच्चे टोमॅटो, लिंबू, आले, हिरवी मिरची, ओवा, काळे मीठ, मिरपूड घालून चटणी बनवली जाते. या चटणीचे सेवन केल्याने पोटा संबंधित आजारांमध्ये फायदा होतो.

पोटाच्या समस्यांपासून मिळते मुक्ती

पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीना सर्वोत्तम मानला जातो. आजकाल खाण्यापिण्यामुळे पोटात बऱ्याच समस्या उद्भवतात. यासाठी एक चमचा पुदीना रसामध्ये, एक कप कोमट पाणी आणि एक चमचा मध मिसळा. याच्या सेवनाने पोटातील आजारांपासून आराम मिळतो (Health benefits of mint aka pudina).

मसालेदार अन्न खाल्ल्याने बर्‍याचदा अपचन आणि पोटदुखी होते. अशा अवस्थेत पुदीना उकळवून त्यात मध घालून प्यायल्यास पोटाचा त्रास कमी होतो.

उलट्यांचा त्रास

उलट्यांची समस्या टाळण्यासाठी पुदीना वापरणे खूप फायदेशीर मानले गेले आहे. यासाठी पुदीनाच्या पानात दोन थेंब मध मिसळून सेवन करावेत.

‘हे’ उपाय देखील आहेत प्रभावी

पुदीनाच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्याला हलके गरम करून, ती कोणत्याही प्रकारच्या जखमेवर किंवा कीटकांच्या चाव्यावर लावा. यामुळे जखम आणि कीटकांच्या चाव्यापासून आराम मिळतो. यासह, यामुळे होणारी वेदना आणि सूज देखील कमी होते.

पुदीन्याचा रस, मिरपूड आणि काळे मीठ मिसळून ते उकळून चहा सारखे प्या. हे सेवन केल्याने सर्दी, पडसे, खोकला आणि तापात आराम मिळतो.

ताज्या पुदीन्याच्या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.

पुदीना पाने सुकवून बनवलेल्या पावडरचा वापर तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत बनवण्यासाठी करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of mint aka pudina)

हेही वाचा :

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.