बटाट्याची साल सोलून फेकून देताय? थांबा, आधी याचे फायदे वाचा…

| Updated on: Feb 05, 2021 | 7:02 PM

बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर असते. या सालीतील हेच घटक शरीरातील अनेक कमतरता दूर करतात.

बटाट्याची साल सोलून फेकून देताय? थांबा, आधी याचे फायदे वाचा...
चमकदार त्वचेसाठी बटाट्यापासून बनवलेला फेस मास्क वापरा
Follow us on

मुंबई : बटाटा ही अशी भाजी आहे की जिचा वापर जवळपास प्रत्येक घरात दररोज केला जातो. मात्र, भाजीत बटाटा घालताना आपण त्याची साल काढून टाकतो. कचरा समजून फेकून दिल्या जाणाऱ्या बटाट्याच्या सालीत अनेक औषधी गुणधर्म असतात. आपण नुसत्याच या साली फेकून देत नाही, तर त्यातील पोषक तत्व देखील फेकून देतो. बटाट्याची साल ही फक्त त्यातील पोषक तत्वासाठीच ओळखली जात नाही, तर वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर गुणकारी असल्याचे म्हटले जाते (Health benefits of Potato peels).

बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर असते. या सालीतील हेच घटक शरीरातील अनेक कमतरता दूर करतात. त्यामुळे अनेक आजार दूर राहण्यासाठी बटाट्याची साल फायदेशीर ठरते. आपळे सौंदर्य उजळवण्यासाठी देखील बटाट्याची साल उपयुक्त आहे. डोळ्यांखालील काळ्या डागापासून ते केसांना नैसर्गिक रंग देण्यापर्यंत बटाट्याच्या सालीचा वापर होते. चला तर, जाणून घेऊया या सालींच्या अनेक फायद्यांविषयी…

रक्तदाब नियंत्रणात राहते

बटाट्यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. तसेच यात व्हिटामिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. या दोन्ही गोष्टी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर असतात. त्यामुळे बटाट्याचे साल स्वच्छ धुवून आपण त्याची भाजी बनवूनही खाऊ शकतात किंवा मग भाजीमध्ये सालीसकट बटाट वापरा.

वजन नियंत्रणात ठेवतो

बटाट्याच्या सालीत मुबलक प्रमाणात फायबरही असते. त्यामुळे आपण त्यांचे सेवन केल्यास आपल्या शरीराला फायबर मिळते. यात फायबर अधिक असल्याने बराच वेळ आपल्याला भूक देखील लागत नाही. परिणामी आपले वजन देखील नियंत्रणात राहते (Health benefits of Potato peels).

अॅनिमियामध्येही फायदेशीर

बटाट्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते. म्हणून आपण बटाट्याच्या सालीचा जेवणात जरुर वापर करावा. एनिमिया असल्यास त्यावरील रामबाण उपाय म्हणून बटाट्याची साल उपयुक्त असते.

शरीराला ऊर्जा प्रदान करते

बटाट्याच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटामिन असल्याने, त्याच्या सेवनाने हाडांना मजबुती मिळते. व्हिटामिन बीमुळे शरीराला ताकद आणि दिवसभराची ऊर्जा मिळते. त्यामुळे शक्य तेवढ्या वेळा बटाटा हा सालीसकट खाण्याचा प्रयत्न करावा.

पचनशक्ती बळकट होते

बटाट्यात मोठ्या प्रमाणात फायबर घटक असतात. यामुळे आपली पचनशक्ती देखील मजबूत होऊ शकते. यामध्ये फायबर अधिक असल्याने पोटाचे विकार देखील होत नाहीत. बद्धकोष्ठतेची समस्या देखील नाहीशी होते. त्यामुळेच बटाट्याची साल खूपच गुणकारी असल्याचे म्हटले जाते.

(Health benefits of Potato peels)

हेही वाचा :