Turmeric | बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवले दूर!

हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. या सगळ्या समस्यांवर कच्ची हळद सामान्यत: प्रतिबंध करण्यासाठी औषध म्हणून वापरली जाते.

Turmeric | बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवले दूर!
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 1:08 PM

मुंबई : हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. या सगळ्या समस्यांवर कच्ची हळद सामान्यत: प्रतिबंध करण्यासाठी औषध म्हणून वापरली जाते. कच्ची हळद अर्थात ओली हळद औषधी गुणांचा खजिना आहे. हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. साधारणतः हिवाळ्यामध्येच ओली हळद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. आयुर्वेदात कच्ची हळद सूज कमी करण्यास, सर्दीची समस्या दूर करण्यासाठी, पाचन प्रणाली सुधारण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, रक्ताचे शुद्धीकरण आणि कर्करोगासारख्या आजारांविरुद्ध लढण्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे (Health Benefits of Raw Turmeric).

प्रोटेस्ट कर्करोगापासून शरीराचे संरक्षण करते.

पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगावर कच्ची हळद अतिशय गुणकारी ठरते. कच्ची हळद कर्करोग पेशींना वाढण्यास प्रतिबंधित करते, तसेच त्यांना नष्ट देखील करते. कच्च्या हळदीचे सेवन ट्युमरला प्रतिबंधित करते.

संधिवातावर फायदेशीर ठरते.

संधिवातादरम्यान जळजळ कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे कच्च्या हळदीचा वापर केला जात आहे. कच्ची हळद सांधेदुखी कमी करण्यास प्रभावी आहे. तसेच, कच्ची हळद शरीराच्या नैसर्गिक पेशी नष्ट करणारे फ्री रॅडिकल्स देखील काढून टाकते.

रोग प्रतिकारकशक्ती बळकट करते.

कच्च्या हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते (Health Benefits of Raw Turmeric).

हृदयरोगात फायदेशीर.

कच्च्या हळदीचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित सर्व समस्यांचा धोका कमी होतो.

इन्सुलिन संतुलित करते.

कच्ची हळद शरीरातील इन्सुलिन संतुलित करते. तसेच, ग्लूकोज नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही कच्ची हळद खूप फायदेशीर ठरते. हळद यकृतासाठीही खूप फायदेशीर आहे, असे बर्‍याच संशोधनात समोर आले आहे. यामुळे यकृताचे कार्य सुधारते.

चेहऱ्यावरील डाग कमी करते.

चेहऱ्यावर काळे डाग पडले असल्यास, अर्धीवाटी बेसन पिठात 2 चमचे लिंबाचा रस आणि कच्च्या हळदीचा छोटासा तुकडा पेस्ट करून घाला. थोडेसे दूध टाकून या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून, पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर किंवा डागांवर लावा. व्यवस्थित सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Health Benefits of Raw Turmeric)

हेही वाचा : 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.