AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाश्त्यात ‘या’ 7 प्रकारच्या स्प्राउट्सचा करा समावेश, दिवसभर शरीरात राहील ऊर्जा

स्प्राउट्सचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तर रोज सकाळचा नाश्ता आरोग्यदायी व्हावा यासाठी मोड आलेले कडधान्य हे एक परिपूर्ण पर्याय आहे. चला जाणून घेऊया अशा 7 स्प्राउट्सबद्दल जे चविष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी देखील आहेत.

नाश्त्यात 'या' 7 प्रकारच्या स्प्राउट्सचा करा समावेश, दिवसभर शरीरात राहील ऊर्जा
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Aug 13, 2025 | 3:41 PM
Share

रोजच्या धावपळीत अनेकजण नाश्ता करणे टाळतात. शरीराला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळावेत म्हणून नाश्ता हेल्दी असावा असे नेहमी सांगितले जाते. तर तुम्ही तुमच्या नाश्त्यात झटपट होणारा आणि हलक्या वजनाच्या पदार्थांचा समावेश करू शकता. तर यामध्ये तुमच्या नाश्त्यात मोड आलेले कडधान्यांचा समावेश करा. नाश्त्यात स्प्राउट्स खाल्ल्याने शरीराला संपूर्ण दिवसासाठी पोषक तत्वे आणि ऊर्जा मिळते. तुम्ही नाश्त्यात अनेक प्रकारचे स्प्राउट्सचा समावेश करू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की नाश्त्यात कोणत्या मोड आलेल्या कडधान्याचा समावेश करू शकतो.

हेल्थलाइनच्या मते, मोड आलेल्या कडधान्यांमध्ये पोषक तत्वे अधिक असतात. तर तुम्ही यांचे सेवन केल्याने शरीराला प्रथिने, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज आणि जीवनसत्त्वे सी आणि के योग्य प्रमाणात मिळतात. कडधान्यांचे मोड वाढल्याने प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच त्यात अमीनो ॲसिड देखील आढळतात. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज नाश्त्यात वेगवेगळ्या मोड आलेल्या कडधान्यांचा समाविष्ट करू शकता.

मोड आलेले मुग

बहुतेक लोकांना मोड आलेले मुग खायला आवडतात. तुम्ही नाश्त्यात मोड आलेले मुग सेवन करू शकतात. तर 1 कप म्हणजे सुमारे 104 ग्रॅम या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये खूप कमी कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यात 3 ग्रॅम प्रथिने असतात, तसेच डेली व्हॅल्यूनुसार 15% व्हिटॅमिन सी, 16% फोलेट आणि 5% लोह असते. मोड आलेल्या मुगामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण किंचित वाढते. यामुळे त्यांचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म वाढतात. यासाठी तुमच्या नाश्त्यात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.

मोड आलेले चणे

तुम्ही नाश्त्यात चणेचे स्प्राउट्सचा देखील समावेश करू शकता. शाकाहारी लोकांसाठी ते प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. हेल्थलाइनच्या मते, एक कप चणे स्प्राउट्समध्ये सुमारे 140 ग्रॅम चण्यात 480 कॅलरीज, 84 ग्रॅम कार्ब्स, 36 ग्रॅम प्रथिने, 8 ग्रॅम फॅट, दैनिक व्हिटॅमिन सीच्या 5% आणि 40% लोह असते.

मसूर स्प्राउट्स

तुम्ही मसूर डाळीचे स्प्राउट्स तयार करून तुमच्या आहारात त्यांचा समावेश करू शकता. हा देखील प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. डाळी रात्रभर पाण्यात भिजवा. त्यानंतर, सकाळी डाळी गाळून घ्या आणि एका भांड्यात किंवा चाळणीत ठेवा. स्वच्छ कापडाने झाकून २ दिवस उबदार जागी ठेवा. अशाने डाळीला मोड येऊ लागतात.

मोड आलेले पांढरे चणे

काळ्या चण्याप्रमाणेच, तुम्ही मोड आलेले पांढरे चण्याचा नाश्त्यात समावेश करू शकता. ते प्रथिनांचा 140 ग्रॅम पांढऱ्या चण्यामध्ये सुमारे 36 ग्रॅम प्रथिने आढळतात. तसेच त्यात दैनंदिन प्रमाणानुसार 40% लोह असते.

राजमा स्प्राउट्स

तुम्ही राजमा स्प्राउट्सचे देखील समावेश करू शकतात. हेल्थलाइनच्या मते, 184 ग्रॅम राजमा स्प्राउट्स मध्ये व्हिटॅमिन सीच्या दैनंदिन मूल्याच्या 79% आणि 8 ग्रॅम प्रथिने असतात. तुम्ही हे तुमच्या आहारात देखील समाविष्ट करू शकता.

मोड आलेले वटाणे

मोड आलेल्या वटाण्यांबद्दल खूप कमी लोकांना माहिती असेल. प्रथिनांव्यतिरिक्त ते व्हिटॅमिन सी आणि फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन बी 9 चा चांगला स्रोत आहे. तुम्ही हे देखील तुमच्या नाश्त्यात समावेश करू शकता.

सोयाबीन स्प्राउट्स

हे सोयाबीनचे स्प्राउट्स कोरियन पदार्थांमध्ये देखील वापरले जाते. एक कप म्हणजे सुमारे 70 ग्रॅम सोयाबीनमध्ये 85 कॅलरीज, 6 ग्रॅम कार्ब्स, 9 ग्रॅम प्रथिने, 5 ग्रॅम फॅट, 12% व्हिटॅमिन सी, 30% फोलेट आणि 8% लोह असते. मोड वाढल्याने सोयाबीनमधील फायटिक ॲसिडची पातळी कमी होते , जे एक अँटीन्यूट्रिएंट आहे जे आयन सारख्या खनिजांना शरीरात योग्यरित्या शोषू देत नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण