AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसतात ही लक्षणे, कशी ओळखावी? वाचू शकतो जीव

आजकाल आपण हार्ट अटॅकबाबत नेहमीच ऐकतो, पाहतो पण आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या झटक्याची तीन तास आधी जाणीव करून देतो. फक्त ती लक्षणे ओळखणे गरजेची असतात. जर ती लक्षणे ओळखून आपण लगेच वैद्यकीय मदत घेतली तर नक्कीच त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. 

हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसतात ही लक्षणे, कशी ओळखावी? वाचू शकतो जीव
Heart Attack Warning Signs 3 Hours Before,Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2025 | 7:56 PM
Share

आजकाल आपण हार्ट अटॅकबाबत नेहमीच ऐकतो. आणि मुख्य म्हणजे सध्याची जीवनशैली पाहता अगदी 30 ते 40 वयातही अटॅक आल्याच्या घटना आपण ऐकतो, पाहतो. पण तुम्हाला माहित आहे का की हार्ट अटॅक येण्याआधी किमान 3 तास आधी आपलं शरीर आपल्याला संकेत देत असतं. पण त्याकडे आपलं लक्ष जातं नाही किंवा ही लक्षणे एवढी गंभीर असू शकतात हे देखील लक्षात येत नाही. पण ही चूक महागात पडू शकते. त्यासाठी हे जाणून घेऊयात की हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसणारी लक्षणे कोणती आहेत आणि ती कशी ओळखावी? जेणे करून आपण सतर्कपणे डॉक्टरांशी संपर्क साधू शकतो.

हृदयविकाराच्या झटक्याच्या तीन तास आधी दिसणारी लक्षणे:

आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या झटक्याची तीन तास आधी जाणीव करून देतो. शरीरात अगदी सूक्ष्म बदल घडले तरी मेंदू आपल्याला लगेच इशारा देतो. जसं की,

छातीत दुखणे किंवा अस्वस्थता: हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीत दुखणे, दाब, जडपणा किंवा छातीत घट्टपणा जाणवू शकतो. हे दुखणे काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकते किंवा ते कमी-जास्त होऊ शकते.

हात, मान, जबडा किंवा पाठीत वेदना किंवा अस्वस्थता: वेदना छातीतून हाताकडे (विशेषतः डाव्या हाताकडे), जबड्याकडे, मानेकडे, पाठीकडे किंवा पोटाकडे पसरू शकते.

श्वास घेण्यास त्रास होणे: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे ही हृदयविकाराची आणखी एक सामान्य लक्षण आहे.

मळमळ किंवा उलट्या: काही लोकांना मळमळ किंवा उलट्या देखील होऊ शकतात.

चक्कर येणे: चक्कर येणे किंवा हलके डोकेदुखी जाणवू शकते.

अचानक खूप घाम येणे: थंड आणि चिकट घाम येऊ शकतो.

अचानक अत्यंत थकवा: काही लोकांना असामान्यपणे थकवा जाणवू शकतो.

अनियमित हृदयाचे ठोके: हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जलद होऊ शकतात.

तसेच तज्ज्ञांच्या मते STRद्वारे देखील ही लक्षणे समजू शकतात. STR म्हणजे,

S – SMILE (हसायला सांगा)

T – TALK (बोलायला सांगा)

R – RAISE BOTH HANDS (दोन्ही हात वर उचलायला सांगा)

जर ती व्यक्ती या तिनही कृती नीट करू शकली तर ठिक. जर त्यापैकी एक जरी नीट करता आली नाही, तर गोष्ट गंभीर आहे हे लक्षात घ्यावं. तेव्हा त्या व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केल्यास जीव वाचवता येऊ शकतो.

व्यक्तीला जीभ बाहेर काढायला सांगा जर त्यांनी जीभ सरळ बाहेर काढली, तर ते सामान्य आहेत. पण जर जीभ एका बाजूला वळलेली असेल (उजवीकडे किंवा डावीकडे), तर त्यांना पुढील तीन तासांत कधीही झटका येऊ शकतो हे नक्की होते. डॉक्टर्स सांगतात की ही लक्षणे ओळखून तीन तासांच्या आत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेल्यास, बहुतांश मृत्यू टाळता येतात. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

या गोष्टी टाळाव्यात जर एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याची शंका असेल, तर त्या व्यक्तीला चालू देऊ नका. जिने चढू किंवा उतरण्यास देऊ नये; ऑटोतून हॉस्पिटलमध्ये नेऊ नये.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.