AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2022: रंगामुळे केसांना हानी पोहचू नये म्हणुन अशाप्रकारे घ्या आपल्या केसांची काळजी, या काही ब्युटी टीप्स फॉलो करा

Holi 2022: अनेकदा केसांवर वारंवार पाणी टाकल्यामुळे आपले केस कमजोर बनतात. केसांचे आरोग्य बिघडू नये म्हणून यंदाच्या होळीला आपल्या केसांची काळजी घ्यायची असेल तर काही ब्युटी टिप्स आपल्याला फॉलो कराव्याच लागतील. केसांचे आरोग्य बिघडू नये म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कोण कोणते तेल वापरावे याबद्दल सांगणार आहोत.

Holi 2022: रंगामुळे केसांना हानी पोहचू नये म्हणुन अशाप्रकारे घ्या आपल्या केसांची काळजी, या काही ब्युटी टीप्स फॉलो करा
होळीला हे खास पदार्थ बनवाImage Credit source: tv9
| Updated on: Feb 25, 2022 | 9:44 PM
Share

काही दिवसातच होळी सण (holi festival) येणार आहे.होळीच्या दिवशी सगळीकडे रंगपंचमी जोरात साजरी केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी प्रत्येक जण रंगाची उधळण करत असतो. रंगांची उधळण (holi celebrations with colours) करत असताना आपल्या शरीराची काळजी घेणे देखील गरजेचे आहे, अशावेळी हा उत्सव साजरा करताना केसांचे आरोग्य कसे चांगले राहील याबद्दल सुद्धा प्रत्येक जण काळजी करताना दिसून येतो. बहुतेकवेळा रंगाची उधळण करत असताना अनेकदा रंग हे केमिकल ने बनवलेले असतात. अशावेळी या केमिकल ने बनवले गेलेले रंगामुळे आपल्या केसांचे आरोग्य बिघडू शकते. अनेकदा केस गळणे, केसांचा रंग निघून जाणे,टक्कल पडणे यासारख्या गंभीर समस्या सुद्धा तुम्हाला उद्भवू शकतील. केमिकल रंगामुळे केस तुटू ( Damage hair on holi)सुद्धा शकतात. काही रंग इतके भयंकर असतात की जे आपल्या त्वचेवरून व केसांच्या मुळापासून काढण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते.

इतकेच नाही तर केसांवर वारंवार पाणी टाकल्याने केसांची मुळे कमजोर होण्याची शक्यता असते. या सर्व समस्येपासून स्वतःला दूर ठेवायचे असल्यास यंदा होळी खेळण्यापूर्वी काही टिप्स नक्की फॉलो करायला हव्यात,ज्यामुळे तुमचे केस खराब होणार नाही म्हणूनच या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी केसांचे आरोग्य चांगले राखण्याकरिता कोणकोणत्या तेलाचा वापर करणे गरजेचे आहे, या बद्दल सांगणार आहोत.

मोहरीचे तेल केसांना लावणे

आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत.या उपायांच्या साह्याने आपण आपले आरोग्य व सहजच जपू शकतो. यंदाच्या रंगपंचमीला तुम्हाला खूप साऱ्या रंगाची उधळण करायची असेल तर अशा वेळी होळी खेळताना एक तासापूर्वी आपल्या केसांना मोहरीचे तेल लावा. असे केल्याने तुमच्या केसांवर कोणतेही प्रकारचे रंग जरी पडल्यास तुमच्या केसांना कोणत्या प्रकारचा धोका उद्भवणार नाही. बहुतेक वेळा केसांवर तेल असल्या कारणामुळे ते रंग शोषून घेतात त्यानंतर केसांना शाम्पू करताना रंग सहजरित्या निघून जातात. मोहरीचे तेल खूपच चिपचिपे असते म्हणूनच या तेलाचा वापर केल्यानंतर दोन ते तीन वेळा केसांना शाम्पू अवश्य करा.

नारळाचं तेल

नारळाचे तेल प्रत्येकाच्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. नारळाला कल्पवृक्ष म्हटले आहे. नारळाच्या सहाय्याने आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करू शकतो.जेव्हा कधी केसांच्या समस्या बद्दल बोलले जाते तेव्हा नारळाच्या तेलाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. नारळाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड व वेगवेगळे विटामिन उपलब्ध असतात, जी आपल्या केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. या तेला मध्ये उपलब्ध असणारे फॅटी ऍसिड आपल्या केसांना मुळापासून मजबूत बनतात. रंग खेळण्या आधी अर्धा तास नारळाच्या तेलाने आपल्या केसांची मालिश करा असे केल्याने कोणताही प्रकारचा रंग तुमच्या केसांना चिपकणार नाही व एका शाम्पू मध्ये केसांवरील रंग सहजरित्या निघून जाईल.

लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल

अनेकदा आपल्या केसांमध्ये एक्स्ट्रा तेल काढण्यासाठी लिंबू चा वापर केला जातो परंतु होळी खेळताना सहज न निघणाऱ्या रंगासाठी सुद्धा लिंबू लाभदायी ठरतो. अनेकदा केमिकल असणाऱ्या रंगामुळे आपल्या केसांचे आरोग्य बिघडते, अशावेळी आपल्याला तेलाचा वापर करावा लागतो. यंदाच्या सणाला होळी खेळण्या आधी तुम्ही तुमच्या केसांना लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल जरूर लावा किंवा या दोन्ही पदार्थांचा हेअर मास्क बनवून आपण आपल्या केसांना लावल्याने तुमच्या केसांच्या मुळांना मजबुती मिळेल व कोणत्याही प्रकारचा रंग सहजच केसांना चीपकणार नाही.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

आई आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी बेस्ट! जाणून घ्या गरोदरपणामध्ये नारळ पाणी पिण्याचे 10 फायदे

चमकदार चेहऱ्यासाठी तयार करा ‘हा’ पॅक…जाणून घ्या 6 घरगुती फेस पॅक

झटक्यात वजन कमी आटोक्यात आणायचंय? पाच प्रकारची पेय ठरतील उपयुक्त

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.