Winter Tips | हिवाळ्याच्या दिवसांत हाता-पायांना सूज येतेय? मग, ‘हे’ उपाय करून पाहा

Winter Tips | हिवाळ्याच्या दिवसांत हाता-पायांना सूज येतेय? मग, ‘हे’ उपाय करून पाहा

हिवाळ्याच्या दिवसांत रक्त परिसंचरण सहसा मंदावते. याच कारणास्तव, या हंगामात ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये देखील वाढ होते.

Harshada Bhirvandekar

|

Jan 15, 2021 | 2:44 PM

मुंबई : थंडीच्या दिवसांत  बर्‍याच लोकांना हाता-पायाला सूज येण्याची समस्या निर्माण होत असते. विशेषत: हात आणि बोटांवर याचा अधिक परिणाम दिसून येतो. कधीकधी यामुळे उद्भवणाऱ्या वेदनांमुळे सामान्य काम करणे देखील कठीण होते. आपणासही अशी समस्या जाणवत असल्यास, काही घरगुती टिप्स वापरुन आपण यातून आराम मिळवू शकता (Home remedies for swelling in hands and feet during winter).

सूज येण्याचे कारण समजून घ्या.

वास्तविक, हिवाळ्याच्या दिवसांत रक्त परिसंचरण सहसा मंदावते. याच कारणास्तव, या हंगामात ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये देखील वाढ होते. अशा परिस्थितीत, आपण थंड ठिकाणी राहात असाल किंवा बरेच दिवस थंड पाण्यात काम करत असाल, तर हात आणि पायांमधील रक्त प्रवाह बराच मंदावतो आणि सुजेची समस्या निर्माण होते. अशावेळी हाता-पायांचा रंगही लालसर दिसू लागतो.

हे आहेत उपाय :

हळद : हळद एक प्रतिजैविक आणि एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. त्याचा प्रभाव देखील गरम आहे. जर, झोपेच्या वेळी सूज आलेल्या जागेवर हळदीची पेस्ट लावली, तर खूप आराम मिळतो. परंतु, हा उपाय नियमित तीन ते चार दिवस सतत करा.

कांदा : कांदा देखील प्रतिजैविक आणि अँटिसेप्टिक गुणधर्मांनी भरलेला आहे. ज्यामुळे याचा वापर लचकेमुळे आलेली सूज कमी करण्यासाठी देखील केला जातो. यासाठी कांद्याचा रस काढा आणि झोपण्यापूर्वी सूजलेल्या भागावर लावा आणि झोपा. दोन ते तीन दिवसांत यामुळे आराम मिळेल (Home remedies for swelling in hands and feet during winter).

मोहरी तेल : मोहरीचे तेल हे सामान्य स्वरूपाचे असते. परंतु, ते योग्य प्रकारे गरम केले तर त्याचा परिणाम चांगला होतो. मोहरीचे तेल गरम झाल्यावर त्यावर खडे मीठ घालावे आणि हे मिश्रण सूजलेल्या भागावर लावावे. सूज आलेल्या भागाला बांधून किंवा मोजे घालून झोपावे. काही दिवस हा उपाय केल्याने आराम मिळेल.

लिंबू : एक वाटी लिंबाचा रस काढून रात्री झोपण्यापूर्वी हातापायाच्या बोटांवर लावा आणि हात पाय व्यवस्थित झाकून झोपा. याने थोड्याच दिवसांत सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.

मटार : हातपायांची सूज कमी करण्यासाठी या मौसमात बाजारात येणारे मटारही खूप फायदेशीर असतात. त्यामुळे हिरवे मटार चांगले उकळून घ्या आणि त्या पाण्याने हातापायाला शेक द्या. रात्री झोपताना मोजे घालून झोपा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा नक्की करा.

बटाट्याचा रस : एक बटाटा घ्या आणि मीठ लावून ज्या ठिकाणी सूज आली आहे तिकडे लावा. असे म्हटले जाते, बटाट्यात जळजळविरोधी तत्त्वे असतात. ज्यामुळे खाज आणि सूजही कमी होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

(Home remedies for swelling in hands and feet during winter)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें