Dry Cough | हिवाळ्याच्या मोसमात कोरड्या खोकल्याने हैराण? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम…

| Updated on: Dec 09, 2020 | 2:05 PM

कोरडा खोकला आपल्याला कित्येक दिवस त्रास देतो. कोरड्या खोकल्यामध्ये कप सिरप देखील पटकन आराम देत नाहीत.

Dry Cough | हिवाळ्याच्या मोसमात कोरड्या खोकल्याने हैराण? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम...
Follow us on

मुंबई : सर्दी, खोकला, थंडी आणि ताप या समस्या हिवाळ्याच्या हंगामात सामान्य आहे. परंतु, जर याकाळात तुम्हाला कोरड्या खोकल्याची (Dry Cough) समस्या उद्भवली असेल, तर ही समस्या काहीशी गंभीर ठरू शकते. कोरडा खोकला आपल्याला कित्येक दिवस त्रास देतो. कोरड्या खोकल्यामध्ये कप सिरप देखील पटकन आराम देत नाहीत. अशावेळी आपण लवकर बरे होऊ इच्छित असल्यास, काही घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता. हे घरगुती उपचार (Home Remedies) आपल्याला कोरड्या खोकल्याच्या त्रासातून आराम देतात आणि इतर समस्यांपासून देखील आपले संरक्षण करतात (Home Remedies on Dry cough during winter).

कोरडा खोकला बरा करण्यासाठी आयुर्वेदातील मध, आले आणि जेष्ठीमध हे घटक महत्त्वाचे ठरतात. या तीनही गोष्टींमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. याशिवाय हे तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत ठेवतात. आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आल्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. मधात विनाशकारी गुणधर्म असतात जे आपल्या घशाला आराम देतात. दुसरीकडे, खोकला बरा करण्यास जेष्ठीमध देखील खूप उपयुक्त आहे.

‘या’ घरगुती उपायांनी खोकला दूर पळवा!

  1. कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी एक चमचा मधात आल्याचा रस मिसळून प्या. यानंतर, तोंडात काही वेळासाठी जेष्ठीमधाची काडी ठेवा. यामुळे आपला घसा कोरडे होणार नाही आणि खोकल्यापासून आराम मिळेल.
  2. पिंपळाची गाठ उगाळून त्यात एक चमचा मध आणि पाणी मिसळा. या चाटणाचे सेवन केल्याने तुमचा खोकला बरा होईल.
  3. आले बारीक किसून त्यात थोडेसे मीठ मिसळा. या मिश्रणाचा छोटा गोळा बनवून तो तोंडात ठेवा आणि त्याचा रस हळू हळू घशात जाऊ द्या. 5 मिनिटांनंतर हा चोथा टाकून द्या आणि तोंड स्वच्छ धुवा.
  4. जेष्ठीमधयुक्त चहा प्यायल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो(Home Remedies on Dry cough during winter).
  5. कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज कोमट पाण्यात 2 चमचे मध घालून प्या. या काढ्याने तुमचा कोरडा खोकला लवकर बरा होईल.
  6. गायीच्या दुधाचं तूप साधारण 15-20 ग्रॅम घ्या आणि त्यामध्ये 10-12 काळी मिरी घेऊन एका वाटीत गॅसवर गरम करायला ठेवा. जेव्हा यातील काळी मिरी तडतडायला लागेल, तेव्हा हे भांडे गॅसवरून खाली उतरवा. हे मिश्रण जरा थंड झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेली खडीसाखर मिक्स करा. हे चाटण सेवन केल्यानंतर साधारण 1 तास तरी काहीच खाऊ नये, याने लवकर आराम मिळतो.
  7. गरम दुधात केवळ हळद मिक्स करावी आणि त्या गरम दुधाचं सेवन करावं. त्यामुळे तुमच्या घशाला आराम मिळतो आणि कोरडा खोकला लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते.

(Home Remedies on Dry cough during winter)

टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.