AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Vacation | स्वस्तात मस्त, थंडीच्या सुट्टीसाठी भारतातील ‘या’ 5 राज्यांना नक्की भेट द्या!  

योगायोगाने नवीन वर्षाची सुरुवातही आणि या वर्षाचा शेवट अगदी ‘विकेंड’च्या दिवशी होणार आहे. त्यामुळे बरेच लोक सुट्टीच्या योजना आखत आहेत.

Winter Vacation | स्वस्तात मस्त, थंडीच्या सुट्टीसाठी भारतातील ‘या’ 5 राज्यांना नक्की भेट द्या!  
ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात जोरदार प्रगतीची चिन्हे
| Updated on: Dec 08, 2020 | 2:41 PM
Share

मुंबई : हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला असून, सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. अशा वेळी लोक आपापल्या आवडत्या ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार देखील करत आहेत. मात्र, अद्याप कोरोना विषाणूचा धोका पूर्णपणे कमी झालेला नाही. परंतु, काही खबरदारी आणि शक्य ती सगळी काळजी घेत आपणही या हंगामात सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. योगायोगाने नवीन वर्षाची सुरुवातही आणि या वर्षाचा शेवट अगदी ‘विकेंड’च्या दिवशी होणार आहे. त्यामुळे बरेच लोक सुट्टीच्या योजना आखत आहेत (Best Winter Vacation Destination in India).

आपण या हिवाळ्याच्या हंगामात काही खास आणि खिशाला परवडणारी ‘डेस्टिनेशन’ शोधात असाल आणि कुठे जावे याचा विचार करत असाल, तर भारतातील ही राज्ये तुमच्या सुट्टीच्या आनंदाला नक्की द्विगुणीत करतील.

केरळ

केरळ हे भारताच्या दक्षिणेस असणारे एका सुंदर पर्यटन ठिकाण आहे. केरळ आपल्यासाठी अनेक प्रकारे विशेष ठरू शकते. येथील उंच पर्वत रांगा, समुद्र किनारे आणि बॅकवॉटर्ससारख्या नैसर्गिक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. आपण येथे भेट देण्याची योजना आखत असाल, तर निदान 4 ते 5 दिवसांचे नियोजन असावे. केरळला जाण्यासाठी आपण रेल्वे किंवा विमान प्रवास यांची आपल्या सोयीनुसार निवड करू शकता. याशिवाय प्रवास आणि येथे राहण्याचा खर्च देखील खूप कमी असून, तुमच्या बजेटमध्ये नक्की मावेल.

गोवा

गोवा हे अगदी सर्वांचे आवडते ठिकाण आहे. गोवा वर्षभर पर्यटकांसाठी खुला असला तरी डिसेंबरमध्ये इथे विशेष गर्दी असते. याचे कारणदेखील खूप खास आहे. गोव्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष अतिशय जल्लोषात साजरे केले जाते. जर आपण गोव्याच्या किनाऱ्यां धाम्ल करण्याची योजना आखत असाल, तर आपल्याला कमीतकमी 2 दिवसांचे नियोजन करावे लागेल. विमान, बस अथवा रेल्वेने तुम्ही गोव्यात जाऊ शकता. शिवाय गोवा फिरण्यासाठी कार भाड्याने देखील घेऊ शकता, ज्याची किंमत दिवसाकाठी केवळ 1100 रुपये असेल. तसेच येथे बाइक्सही भाड्यानेही मिळतात, त्यासाठी तुम्हाला फक्त 500 रुपये खर्च करावे लागतील (Best Winter Vacation Destination in India).

गुजरात

गुजरातमध्ये फिरण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी बरेच काही आहे. आपण या ठिकाणी किमान 3 दिवसांचे नियोजन करुन भेट देऊ शकता. वर्षाच्या कोणत्याही महिन्यात गुजरातच्या इतर भागात फिरू शकता. परंतु, कच्छला भेट देण्यासाठी डिसेंबर महिन्यापेक्षा कोणताही चांगला महिना नाही. याकाळात तीन महिने चालणाऱ्या रण उत्सवातून बऱ्याच लोकांना आकर्षित केले जाते. याव्यतिरिक्त तुम्ही भुजमध्ये एक दिवस घालवू शकता. कच्छ येथे मुक्काम करण्यासाठी तुम्ही रण उत्सवाचे पॅकेज देखील घेऊ शकता. या पॅकेजमध्ये भुज विमानतळ आणि रेल्वे स्टेशनपर्यंतचे भाडेदेखील समाविष्ट केलेले असते.

राजस्थान

राजस्थानमधील वाळवंट फिरण्यासाठी डिसेंबर महिना हा सर्वोत्तम काळ आहे. कमीतकमी 6 दिवसांची योजना आखून तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता. जयपूरमध्ये 2 दिवस, जैसलमेरमध्ये 2 दिवस, जोधपूरमध्ये 1 दिवस आणि उदयपुरात 1 दिवस, अशी ही ट्रीप होऊ शकते. राजस्थानला जाण्यासाठी आपण बस, रेल्वे किंवा विमानाने दिल्लीला पोहोचू शकता. तिथून पर्यायी वाहनाने राजस्थानला मार्गक्रमण करू शकता (Best Winter Vacation Destination in India).

काश्मीर

काश्मीरमधील गुलमर्ग ‘बर्फ प्रेमीं’साठी सर्वात खास गंतव्यस्थान आहे. जर आपण गुलमर्ग येथे येण्याची योजना आखत असाल तर, कमीतकमी 3 दिवसांचे नियोजन करा. जेणेकरून आपण येथील हवामान आणि हिमवृष्टीचा आनंद घेऊ शकाल. स्कीइंग, स्लेडिंग आणि स्नो स्कूटर अशा बर्‍याच गोष्टीं आनंद आपण येथे घेऊ शकता. काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले जाते. त्यामुळे एकदातरी हिवाळ्याच्या हंगामात येथे भेट दिलीच पाहिजे.

(Best Winter Vacation Destination in India)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.