AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक वर्षाच्या आतील बाळाला मध द्यावे का? तज्ज्ञ काय सांगतात?

बाळाच्या जन्मानंतर, पालकांना सतत काळजी असते की त्यांना काय खायला द्यावे आणि काय नाही याबाब सतत काळजी घेतली जाते. मग एक वर्षाच्या आतील बाळाला मध देणे कितपत सुरक्षित असते. एक वर्षाच्या आतील बाळाला मध देऊ शकतो का जाणून घेऊयात तज्ज्ञ काय सांगतात ते?

एक वर्षाच्या आतील बाळाला मध द्यावे का? तज्ज्ञ काय सांगतात?
Honey for Babies Under 1, Expert Advice & RisksImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 15, 2025 | 8:21 PM
Share

बाळाच्या जन्मानंतर, पालकांना सतत काळजी असते की त्यांना काय खायला द्यावे आणि काय नाही. बाळासाठी काय योग्य आहे काय नाही याची काळजी घेतली जाते. त्याच पद्धतीने मधाबाबत देखील अनेक संभ्रम आहेत की एक वर्षाच्याआधी बाळा मध द्यावे का? एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलाला मध देणे योग्य आहे की नाही. कज्ज्ञ काय म्हणतात जाणून घेऊयात.

ही प्रथा केवळ वडीलधारीच पाळत नाहीत तर आजकालचे लोकही ही प्रथा पाळतात. लहान मुलाला मध खाऊ घालणे हानिकारक असू शकते. तज्ञ देखील ही एक अस्वास्थ्यकर प्रथा मानतात. मध हे प्रौढांसाठी एक नैसर्गिक गोडवा मानला जातो आणि ते मर्यादित प्रमाणात घेतल्याने फायदा होतो. पण मुलांच्या बाबतीत असे नाही. त्याची कारणे जाणून घेऊयात.

मुलांची पचनसंस्था प्रौढांपेक्षा वेगळी असते.

दिल्ली एम्समधील बालरोग विभागाचे माजी डॉ. राकेश बागडी म्हणतात की मध एक वर्षापेक्षा लहान मुलांना आजारी बनवू शकते. जरी मधात नैसर्गिक गोडवा, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याचे म्हटले जाते आणि ते अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. परंतु बाळाची पचनसंस्था प्रौढांपेक्षा खूप वेगळी आहे. आपण सहज पचवू शकणारी गोष्ट कधीकधी मुलांसाठी हानिकारक ठरू शकते.

एक वर्षापूर्वी मुलाला मध का देऊ नये?

कधीकधी मधात क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाचा जीवाणू असू शकतो. हा जीवाणू प्रौढांसाठी हानिकारक नाही कारण आपली पचनसंस्था तो नष्ट करते. परंतु लहान मुलांची, विशेषतः एक वर्षाखालील मुलांची पचनसंस्था तितकी विकसित नसते, त्यामुळे हे जीवाणू त्यांच्या शरीरात वाढू शकतात आणि इंफेंट बोटुलिझम नावाचा गंभीर आजार होऊ शकतो .

मुलांना मध देण्याचे तोटे

इंफेंट बोटुलिझममध्ये, बाळाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. तो व्यवस्थित रडू शकत नाही, त्याला चोखण्यास आणि गिळण्यास त्रास होतो आणि श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास ते प्राणघातक ठरू शकते. भयानक गोष्ट अशी आहे की जरी या आजाराचे कारण असलेले बॅक्टेरिया मधात खूप कमी प्रमाणात असले तरी ते मुलासाठी धोकादायक देखील ठरू शकते.

तज्ज्ञांचा स्पष्टपणे सल्ला 

जागतिक आरोग्य संघटना ( WHO) अमेरिकन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स आणि भारतातील अनेक आरोग्य तज्ज्ञ स्पष्टपणे सल्ला देतात की एक वर्षाखालील मुलांना मध कोणत्याही स्वरूपात देऊ नये. ते कच्चे मध असो, गरम पाण्यात मिसळलेले असो किंवा कोणत्याही घरगुती उपायात वापरलेले असो, ते सुरक्षित नाही.

महत्त्वाची टीप: सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे बाळाच्या खाण्याबाबत असा कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण