
मीठाशिवाय आपण कोणताही पदार्थ खाण्याची कल्पनाही करू शकत नाही. कारण मीठ हा आपल्या अन्नपदार्थांचा एक महत्वाचा भाग आहे जो आपल्या जेवणाची चव वाढवतो. जेवणात एक वेळ मीठ कमी असले तरी चालेल पण मीठा शिवाय जेवण खाण्याची कल्पनाही करू शकत नाही. अशातच आपल्याकडे असे काहीजण आहेत ज्यांना जेवताना ताटात थोडे मीठ लागतेच. पण मीठ नेहमी योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, अन्यथा ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही जास्त मीठ खाल्ले तर ते तुमच्या पोटाचे त्रास उद्भवू शकतो. तसेच मीठाच्या अती सेवनाने उच्च रक्तदाब आणि किडनीवर मोठा परिणाम होऊ शकतो. मीठ आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व म्हणून काम करते. चला तर मग जाणून घेऊया एका दिवसात किती मीठ सेवन करावे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 5 ग्रॅम (1 चमचे) पेक्षा जास्त मीठ सेवन करू नये. परंतु आपल्या भारतातील काही लोकं एका दिवसात 10-15 ग्रॅम मीठ सेवन करतात, ज्यामुळे बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
याबद्दल दिल्लीतील धर्मशाला नारायण रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. कपिल कुमार कुर्शीवाल यांनी सांगितले की दिवसातून 5 ग्रॅम मीठ आपल्या शरीरात 2000 मिलीग्राम सोडियमची पूर्तता करते. त्यामुळे जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तदाब व किडनीच्या समस्या देखील वाढू शकतात. यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो.
जर तुमचे दैनंदिन आहारात मिठाचे सेवन मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पोट, यकृत किंवा इतर अवयवांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत छातीत जळजळ, आम्लता किंवा इतर आरोग्य समस्या तुम्हाला सतत त्रास देऊ लागतात. जर ही चूक बराच काळ पुनरावृत्ती झाली तर पचनक्रिया बिघडल्याच्या तक्रारी निर्माण होऊ लागतात.
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि ज्यांना हृदयरोग आहे त्यांनी कमी मीठ खावे कारण त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होऊ शकतो.
जास्त मीठ खाल्ल्याने हाडांना नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर याच्या अतीसेवनाने शरीरातील कॅल्शियम कमी होते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.
जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पोट फुगणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या सतावू शकतात.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)