चेहरा धुताना तुम्हीदेखील या चुका करता का ? दिवसभरात किती वेळा चेहरा धुणे योग्य ?

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी, तो नीट धुणे खूप महत्वाचे आहे. पण चेहरा धुण्याचीही योग्य पद्धत असते.

चेहरा धुताना तुम्हीदेखील या चुका करता का ? दिवसभरात किती वेळा चेहरा धुणे योग्य ?
| Updated on: Jun 10, 2023 | 1:28 PM

Face Washing : ऊन, वारा, मेकअप, स्क्रीनची कधीही न संपणारी चकाकी अशा अनेक गोष्टींचा अनुभव आपला चेहरा घेत असतो. अमेरिकेत 2017 मध्ये स्किन केअर ब्रँडने एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात 1000 स्त्री-पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. सर्वेक्षणानुसार, अर्ध्याहून अधिक लोकांनी सांगितले की ते झोपण्यापूर्वी चेहरा धुण्यास विसरतात.

या सर्व्हे नुसार, 80 टक्के अमेरिकन लोक त्यांचा चेहरा धुण्याशी संबंधित किमान एक चूक करतात. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी, आपल्या लाईफस्टाइलसाठी चेहरा धुणे खूप महत्वाचे आहे. पण दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच चेहरा धुण्याची योग्य पद्धत कोणती ?

चेहरा धुणं गरजेचं का आहे ?

निरोगी दिसण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी चेहरा धुणे खूप महत्वाचे आहे. तुमचा चेहरा दिवसभर उष्णता, आर्द्रता आणि घाण यांच्या संपर्कात असतो. यामुळे त्वचा निस्तेज दिसते. जर आपण आपल्या त्वचेची स्वच्छता ठेवली नाही तर मुरुमांसह त्वचेशी संबंधित इतर समस्या सुरू होतील. म्हणूनच फेस क्लिन्जिंग करणं खूप गरजेचं आहे.

किती वेळा चेहरा धुवावा ?

साधारणपणे दिवसातून दोनदा चेहरा धुवा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. असे केल्याने त्वचेवर साचलेली घाण निघून जाते. पण, यासाठी कोणतेही निश्चित मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. तुम्ही तुमची त्वचा किती वेळा धुवावी यासाठी त्वचारोगतज्ज्ञांशी बोला. तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

किमान दोन वेळा तरी चेहरा धुवावा

दिवसातून किमान दोनदा तरी चेहरा धुवावा. जर तुमची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा धुवू शकता. यानंतर, तुम्ही सकाळी कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला रोसेसिया किंवा एक्जिमा असेल तर रात्री चेहरा धुवा आणि झोपा.