
पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील डोंगराळ पर्यटनस्थळांचं सौंदर्य अधिकच खुलतं. महाबळेश्वर, पंचगणी, खंडाळा आणि विशेषतः लोणावळा ही ठिकाणं निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासमान वाटतात. पावसात न्हालेली हिरवाई, धबधबे, आणि थंड हवामान यामुळे लोणावळ्याचं सौंदर्य अधिकच खुलून येतं.
मात्र, या निसर्गसंपन्न सहलीचं अनुभव घेताना काही गोष्टींची योग्य पूर्वतयारी केली नाही, तर आनंददायी सहल त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच, जर तुम्ही लवकरच लोणावळा ट्रिपची योजना करत असाल, तर खालील सावधगिरी आणि टिप्स लक्षात ठेवाव्यात.
1. लोणावळ्यात पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे सहलीसाठी जाताना रेनकोट, छत्री, वॉटरप्रूफ बॅग आणि मजबूत ट्रेकिंग शूज ही आवश्यक सामग्री नक्की बरोबर ठेवा. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यास तयार असणं केव्हाही शहाणपणाचं ठरतं.
2. पावसाळ्यात अचानक मुसळधार पावसामुळे रस्ते बंद होणे, भूस्खलन होणे अशी संकटं उद्भवू शकतात. त्यामुळे निघण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाज आणि ट्रॅव्हल रूटचे पर्यायी मार्ग आधीच पाहून ठेवा.
3. पावसात ट्रेकिंगला वेगळंच रोमांच असतं, पण रस्ते पायघसाड असतात. स्लिपर्सऐवजी ट्रेकिंग शूज वापरा आणि शक्य असल्यास स्थानिक गाइडचा सल्ला घ्या. अतिउत्साह टाळा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
4.लोणावळ्यातील अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क आणि डिजिटल पेमेंट्स दोन्ही बंद पडू शकतात. त्यामुळे थोडी रोख रक्कम जवळ ठेवा आणि गुगल मॅप्सचा ऑफलाइन नकाशा आधीच डाउनलोड करा.
5. पावसात लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे हॉटेल किंवा होमस्टे आधीच ऑनलाइन बुक केल्यास शेवटच्या क्षणी निवास शोधण्याचा त्रास टाळता येतो.
6. पावसात भिजण्याची शक्यता अधिक असल्याने फक्त आवश्यक सामानच बरोबर घ्या. कपडे, औषधं, टॉवेल, एक्स्ट्रा जोडी बूट, छत्री हे सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवा. ओझं कमी असेल तर प्रवासही अधिक सुखद होतो.
पावसात इथे नुसतं बसून पाय पाण्यात बुडवले तरी स्वर्गीय आनंद मिळतो. डोंगरावरून वाहत येणारं पाणी आणि पायऱ्यांवरून कोसळणारा धबधबा
इतिहासप्रेमींसाठी खास! 2000 वर्षांपूर्वीच्या या बौद्ध लेण्या दगडात कोरलेल्या असून, निसर्गाच्या कुशीत शांत आणि भारावून टाकणारं वातावरण देतात.
सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वोत्तम! डोंगरांमधून वाऱ्याची झुळूक, थोडं मिस्ट आणि अफाट दृश्य निसर्गाशी थेट संवाद साधायचं असेल तर इथे नक्की जा.