Matar Kachori: तेलाचा वापर न करता बनवा चवदार मटार कचोरी, लिहून घ्या रेसिपी
Matar Kachori Without Oil: तेलाचा वापर न करता चवदार मटार कचोरी बनवता येते. तुम्हालाही अशी कचोरी बनवायची असेल तर रेसिपी लिहून घ्या...

कचोरी बनवण्यासाठी तेल हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कारण कचोरी ही तेलात तळलेली असते. पण जर तुम्ही डायट वर असाल किंवा हार्ट पेशंट असाल तर तेलाचा वापर न करता बनवलेली मटार कचोरी तुम्ही खाऊ शकता. आता ही चवदार मटार कचोरी कशी बनवायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया तेलाचा वापर न करता मटार कचोरी कशी बनवता येते…
मटार कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
-एक कप सोललेला मटार -एक कप रवा -एक चमचा चिली फ्लेक्स -हींग -चवीनुसार मीठ -एक चमचा तूप -दोन कप पाणी -बारीक कापलेला कांदा -एक चमचा धणे -एक चमचा बडीशेप -एक चमचा जीरे -हळद -आमचूर पावडर -अर्धा कप बूंदी
कचोरी बनवण्याची कृती
-सर्वप्रथम मटार सोलून घ्या. तो स्वच्छ पाण्यात धुवा आणि पॅनमध्ये पाणी घालून उकडून घ्या -मटार शिजल्यानंतर गॅस बंद करा. मटारमधील पाणी काढून टाका आणि थंड होण्यासाठी ठेवा -दुसऱ्या पॅनमध्ये दोन कप पाणी टाका. त्यामध्ये एक चमचा तूप, चिली फ्लेक्स, मीठ आणि रवा टाका. रवा सर्व पाणी शोषून घेणार. त्यानंतर गॅस बंद करा आणि तयार झालेल्या रव्याचे मिश्रण थंड करण्यासाठी एका ताटात ठेवा. -मिश्रण थंड झाल्यानंतर चांगले मळून घ्या. -पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात जीर, बडीशेप, धणे बारीक करून टाका. त्यानंतर बारीक कापलेला कांदा टाका. -कांदा चांगला तळल्यानंतर त्यामध्ये मटार घाला. सोबत हळद, लाल मिरची पावडर, मिठ, आमचूर पावडर आणि गरम मसाले घाला. -शेवटी बूंदी क्रश करून टाका. मॅशरने मटार क्रश करून घ्या. -मळून ठेवलेले पिठ हातात घ्या. त्यामध्ये तयार झालेले मटारचे मिश्रण भरून गोल करा. -अप्पे पात्राला तेल लावून घ्या. त्यामध्ये तयार झालेल्या कचोरी ठेवा. -अप्पे पात्रावर झाकण ठेवून कचोरी शिजवून घ्या