वर्किंग वुमन असाल तर ‘हे’ 10 मिनिटांचे ब्युटी रूटीन तुमची त्वचा बनवेल नैसर्गिकरित्या चमकदार
आजकाल रोजच्या धावपळीतून व कामामधून प्रत्येक महिलेला स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आणि वैयक्तिक त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तर आजच्या या लेखात आपण फक्त 10 मिनिटांत सोप्या स्टेपच्या मदतीने त्वचेची काळजी कशी घेऊ शकता ते जाणून घेऊयात.

आजच्या या स्पर्धात्मक जगात प्रत्येक व्यक्ती कामामध्ये अडकलेली आहे. अशातच ज्या महिला वर्किंग आहेत त्यांच्यासाठी काम आणि घर हे दोन्ही गोष्टी साभांळणे आव्हानात्मक आहे. ऑफिसचे काम आणि घरातील काम तसेच इतर गोष्टी संतुलित करताना मात्र प्रत्येक महिलेचे स्वत:कडे जास्त दुर्लक्ष होते. यासर्वांमध्ये स्वतःची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. त्वचा आणि वैयक्तिक सौंदर्य हे केवळ तरुण दिसण्यासाठी आवश्यक नाही तर ते आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे आणि आत्मविश्वासासाठी ते खूप महत्वाचे आहे. मात्र दररोज त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला तासंतास देऊ शकत नाही. यासाठी तुम्ही असे ब्युटी रूटीनंचा अवलंब करा जे एक साधं आणि काही मिनिटांत होणारं असेल. जेणेकरून तुम्ही व्यस्त शेडयुलमध्ये ही तुमची त्वचा निरोगी आणि ताजी ठेवू शकाल. तुम्हाला तुमच्या संपूर्ण दिवसातून फक्त 10 मिनिटे तुमच्या त्वचेसाठी द्यावी लागतील, जेणेकरून तुम्ही दिवसभर ताजेतवाने दिसू शकाल.
तर त्वचेची काळजी घेताना कोणत्याही जड मेकअपची किंवा महागड्या प्रोडक्टची आवश्यकता नाही. ही दिनचर्या नियमितपणे पाळली पाहिजे फक्त थोडे नियोजन करून. या लेखात आम्ही तुम्हाला पाच सोप्या स्टेप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा दिवस सुरू करू शकता. यामुळे तुमची त्वचा दिवसभर फ्रेश आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसेल. चला तर मग जाणून घेऊयात.
क्लिंजींग
चेहरा स्वच्छ करणे ही पहिली स्टेप आहे, यासाठी सकाळी उठताच प्रथम तुमचा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. यामुळे रात्रीतून त्वचेवर साचलेले अतिरिक्त तेल स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर ताजेपणा येईल. यासाठी तुम्हाला सुमारे दोन ते तीन मिनिटे लागतील.
टोनिंगसाठी करा हे काम
चेहरा धुतल्यानंतर टोनिंग करणे आवश्यक आहे, यामुळे त्वचेचे छिद्र घट्ट होतात आणि त्वचेचा टोन दिसून येतो आणि त्वचेचा पीएच देखील संतुलित होतो. यासाठी, तुमच्या चेहऱ्यावर गुलाबपाणी स्प्रे करा आणि नंतर ते असेच सुकू द्या.
मॉइश्चरायझिंग आवश्यक आहे
टोनिंग केल्यानंतर त्वचेला हायड्रेट करणे महत्वाचे असते. यासाठी तुम्ही हवामान आणि त्वचेच्या पोतानुसार तेलकट, कोरडे असे मॉइश्चरायझर लावू शकता. जेल किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरण्याचा प्रयत्न करा, ते त्वचेत लवकर शोषले जातात आणि तेलकट वाटत नाहीत, त्याचबरोबर त्वचा हायड्रेटेड आणि ताजी दिसते.
सनस्क्रीन नक्की लावा
उन्हामुळे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे, म्हणून दररोज संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर किमान SPF 30 किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन लावा. यासोबतच, सन प्रोटेक्शन लिप बाम लावा.
3 मिनिटांत मेकअप लूक
जड मेकअप बेस वापरण्याऐवजी, प्रथम थोडे बीबी क्रीम घ्या आणि ते चेहऱ्यावर चांगले लावा. यासाठी तुम्ही ब्लेंडर ब्रश वापरू शकता. त्यानंतर काजल आणि लिप बाम किंवा लिपस्टिक लावा. तसेच, डोळ्यांवर लाइनर लावण्याऐवजी फक्त पारदर्शक मस्कारा लावा. अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे नैसर्गिक आणि फ्रेश लूक मिळेल.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
