नवीन वर्षात बाहेर ट्रिपला जाण्याचा प्लॅन करताय तर ‘या’ चुका टाळा, नाहीतर संपुर्ण ट्रिप होईल खराब
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकं त्यांच्या कुटुंबासह, मित्रांसह किंवा जोडीदारांसह ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत असतात. परंतु जर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय तुमची ट्रिप आनंद फिरायची असेल तर तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

2026 या नवीन वर्षाचे काही दिवसांनी आगमन होणार आहे. येणारे नवीन वर्ष लोकांना नवीन सुरुवात करण्याची संधी देते. तर आपल्यापैकी अनेकजण हे या नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि आठवणींनी करायची असते, म्हणून ते मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. रोजच्या कामाच्या आणि इतर ताणतणावांच्या व्यस्त वर्षानंतर नवीन वर्षाची सकाळ ही ताजेतवाने आणि आराम करण्याची आणि वर्षाची सुरुवात करण्याची संधी देते. दोन ते तीन दिवसांच्या ट्रिपसाठी लोकं बहुतेकदा बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवळीच्या नैसर्गिक ठिकाणी जाण्याची योजना आखतात.
जर तुम्हीही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बाहेर फिरायला ट्रिपला जाण्याचे नियोजन करत असाल तर सर्वात आधी प्रत्येकाने काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण आपल्या सर्वांनाच माहित आहेच की नवीन वर्षाच्या काही दिवस आधीच अनेक ठिकाणी लोकं जाऊन राहतात. त्यामुळे प्रचंड गर्दी असते, म्हणून तुम्ही तुमच्या ट्रिपचे नियोजन करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा आनंद घेऊ शकाल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
ॲडव्हान्स बुकिंग करा
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ट्रेन व विमान तिकिटांपासून ते हॉटेलपर्यंत सर्व काही आठवडाआधीच पूर्ण बुकिंग झालेलीअसते. म्हणून तुमचे फिरण्याचे ठिकाण लक्षात घेऊन तुमची तिकिटं आणि हॉटेलचे ॲडव्हान्स बुकिंग करा. तुमचे हॉटेल आणि ट्रॅव्हल किमान दोन ते तीन आठवडे आधीच बुक करा. हे तुम्हाला शेवटच्या क्षणी होणाऱ्या त्रासांपासून वाचवेल आणि योग्य किमतीत बुकिंग देखील होईल.
हवामानानुसार ठिकाण निवडणे
हवामानानुसार तुमचे ठिकाण निवडा. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या भागात या दिवसांमध्ये खूप गर्दी असते. थंड हवामानात अनेक लोकांना सर्दी आणि फ्लू होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून हवामानानुसार ठिकाण निवडा. नवीन वर्षाच्या वेळी पर्यटन स्थळे अनेकदा गर्दीची असतात. जर तुम्हाला शांततेत वेळ घालवायचा असेल तर त्यानुसार ठिकाण निवडा.
हॉटेल्स आणि ठिकाणांचे रिव्ह्यू नक्की चेक करा
लोकं अनेकदा ऑनलाइन फोटोंच्या आधारे बुकिंग करतात, परंतु वास्तव वेगळेच असते. म्हणून हॉटेल बुक करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यू आणि रेटिंग्जकडे लक्ष द्या. यामुळे तुम्हाला स्वच्छता, सुरक्षितता, कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि जवळपासच्या सुविधांची कल्पना येईल.
शिस्त राखा
इतर कोणत्याही ठिकाणी भेट देताना, स्वच्छता राखण्यासारखी शिस्त पाळण्याचे लक्षात ठेवा. स्थानिकांशी भांडणे टाळा. स्थानिकांच्या भावनांचा विचारशील आणि आदर ठेवा.
तुमचे बजेट योग्यरित्या प्लॅन करा
बजेट तुमच्या ट्रिपवर परिणाम करते. त्यामुळे हॉटेल, ट्रॅव्हलिंग, जेवण, प्रवास तिकिटे, खरेदी आणि आपत्कालीन निधी यासारख्या तुमच्या खर्चाचा अंदाज लावा. कारण ठरवलेले बजेट हे तुमचे अनावश्यक खर्च टाळेल आणि तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या ट्रिपचा आनंद घेता येईल.
आवश्यक वस्तू सोबत ठेवा
तुम्ही जिथे खरेदी करत असाल तिथे हवामानाची अचूक माहिती गोळा करा आणि योग्य कपडे आणि आवश्यक वस्तू पॅक करा. तसेच प्रवासात मळमळ, अतिसार, डोकेदुखी आणि शरीरदुखीसाठी औषधे सोबत ठेवा. जर तुम्ही आधीच औषधे घेत असाल तर ती नक्की तुमच्या सोबत घेतली आहे की नाही हे चेक करत राहा. तसेच, टॉर्च आणि अतिरिक्त रोख रक्कम सोबत आणा, कारण काही ठिकाणी ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जात नाही.
