AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात त्वचेवर पुरळ, मुरूमांची समस्या सतावतेय? स्किनकेअर रूटिनमध्ये ‘या’ नैसर्गिक घटकांचा करा वापर

कडक उन्हाळ्यात निरोगी त्वचा राखणे आव्हानात्मक असते. मात्र असे काही नैसर्गिक घटक आहेत जे त्वचेला आराम देऊ शकतात आणि या ऋतूत वारंवार उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण नैसर्गिक घटक कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात त्वचेवर पुरळ, मुरूमांची समस्या सतावतेय? स्किनकेअर रूटिनमध्ये 'या' नैसर्गिक घटकांचा करा वापर
त्वचेवर पुरळ, मुरूमांची समस्या सतावतेय? Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 23, 2026 | 3:06 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की त्वचेवर पुरळ, खाज, जळजळ, मुरुमे आणि समस्या सतावू लागतात. खरे तर या दिवसातील तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि घाम या सर्वांमुळे त्वचेवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये स्किन केअर रूटिंगमध्ये काही नैसर्गिक घटकांचा वापर केला जात आहे. उन्हाळ्यात तुमच्या स्किन केअर रूटिंगमध्ये या घटकांचा समावेश केल्यास त्वचेला आराम मिळण्यास आणि या दमट, उष्ण हवामानाशी संबंधित त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

शतकानुशतके उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकं आरोग्य जपण्यापासून ते त्वचा आणि केसांची काळजी घेण्यापर्यंत विविध समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करत आले आहेत. हे घटक अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहेत. ज्यामुळे यांच्या वापराने त्वचेवर उत्तम परिणाम दिसून येतो. उन्हाळ्यातही थंडावा देणारे अनेक नैसर्गिक घटक आहेत. चला अशाच पाच प्रभावी आणि पारंपरिक घटकांबद्दल जाणून घेऊयात.

चंदन आहे अप्रतिम

प्राचीन काळापासून त्वचेच्या काळजीसाठी चंदनाचा वापर केला जात आहे. चंदन त्याच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखले जाते. चंदन त्वचेची जळजळ शांत करते, पुरळांपासून आराम देते आणि सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. चंदन मुरुमे कमी करण्यासाठी आणि कांती सुधारण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी उन्हाळ्यात तुम्ही त्याची पेस्ट बनवून तुमच्या त्वचेला लावू शकता. अधिक फायद्यांसाठी तुम्ही चंदनामध्ये गुलाबजल मिक्स करू शकता. उष्णतेमुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठीही चंदनाची पेस्ट खूप फायदेशीर आहे.

त्वचेसाठी दही देखील फायदेशीर

उन्हाळ्यात लोकं मोठ्या प्रमाणात दही खातात कारण त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पण दह्याचा वापर त्वचेवर केल्याने उन्हाळ्यात त्याचे आश्चर्यकारक परिणाम होतात. दह्यापासून बनवलेला फेस पॅक चेहऱ्याला त्वरित थंडावा देतो. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड मृत त्वचा आणि घाण काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. ते त्वचेला आर्द्रता देऊन मऊ करते आणि त्वचेचा काळपटपणा कमी करण्यासाठीही प्रभावी आहे. यासाठी दही फेटून घ्या, त्यात चिमूटभर हळद टाका आणि चेहऱ्यावर लावा.

कोरफड त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी एक पॉवरफुल घटक आहे

भारतात कोरफडीला आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध मानली जाते आणि उन्हाळ्यात त्वचेला आराम देणारा एक प्रभावी घटक आहे. कोरफडीचा गर त्वचा मऊ करतो आणि पुरळ कमी करण्यासही मदत करतो.

मुलतानी माती

उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देणाऱ्या नैसर्गिक घटकांबद्दल बोलायचे झाल्यास, मुलतानी मातीचा वापर सर्वात आधी करत असतो. मुलतानी माती पाण्यात भिजवून त्यात कोरफड जेल, चिमूटभर हळद, चंदन पावडर आणि गुलाबजल यांसारखे घटक मिक्स करून त्वचेवर लावू शकता. यामुळे उन्हाळ्यातही तुमची त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. मुलतानी मातीचा वापर केस धुण्यासाठीही करता येतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच