AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Vidhan Parishad Election : नाशिकमध्ये मतमोजणीआधी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमदेवाराचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप

Nashik Vidhan Parishad Election : आज विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. एकूण 11 जागांचे निकाल आज जाहीर होतील. त्यात नाशिकच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कारण बंडखोरीमुळे नाशिकच्या जागेची बरीच चर्चा झाली होती.

Nashik Vidhan Parishad Election : नाशिकमध्ये मतमोजणीआधी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमदेवाराचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप
Narendra Darade-Chhagan Bhujbal
| Updated on: Jun 22, 2026 | 8:36 AM
Share

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मागच्या आठवड्यात निवडणूक झाली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर सदस्य निवडले जाणार आहेत. 17 पैकी 6 जागांवर आधीच महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. आज उर्वरित 11 जागांचा निकाल लागणार आहे. त्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. या विधान परिषदेच्या 17 जागांमध्ये नाशिक आणि जळगावच्या जागेची सर्वाधिक चर्चा झाली. कारण या दोन मतदारसंघात बंडखोरी झाली होती. महायुती एकत्र ही निवडणूक लढवत असल्याने नाशिकची जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेली. शिवसेनेने इथून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली. ते महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. पण भाजपच्या गणेश गीते आणि गोकुळे गीते यांनी बंडखोरी करुन उमेदवारी दाखल केली.

त्यामुळे महायुतीच्या गोटात टेन्शन वाढलं होतं. गणेश गीते यांची भाजप नेत्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी माघार घेतली. पण गोकुळ गीते त्यांच्या उमेदवारी ठाम राहिले. हे दोघे बंधु आहेत. शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून गिरीश महाजन यांना, गोकुळ गीते यांची समजूत काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घेण्याची वेळ निघून गेलेली होती. त्यामुळे त्यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी महायुतीची मागणी होती. गोकुळ गीते यांनी पाठिंबा दिला नाही. पण प्रचार थांबवून एकप्रकारे महायुतीची मदत केली. गोकुळ गीते यांचं म्हणणं होतं की, “माझा भाजपशी संबंध नाही. माझे बंधु गणेश गीते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवू शकतो”

मतमोजणी सुरु होण्यापूर्वी महायुतीतील बेबनाव

दरम्यान आता नाशिकमध्ये मतमोजणी सुरु होण्यापूर्वी महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. ‘छगन भुजबळ यांनी आपल्याला मदत केली नाही’ असा गंभीर आरोप महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे. “येवल्याची आठही मत आपल्याला पडली नाहीत. समीर भुजबळ कॅम्प मध्ये होते. अनेक बैठका झाल्या, नेत्यांनी आदेश दिले, तरीदेखील त्यांनी असे का केले माहीत नाही” असा नरेंद्र दराडे यांनी छगन भुजबळांवर थेट आरोप केला. कितीही मतांची फाटा फूट झाली, तरी आपणच विजय होणार असा विश्वास नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केला.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप