AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रथमच पालकत्व अनुभवताय? तुमच्या लहानग्यांसाठी ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका…

नवजात शिशूंचे आरोग्य जपणे अत्यंत कठीण असते. त्यातच जर ते पहिलेच अपत्य असेल तर पालकांसाठी सर्वच काही नवीन असतं. यात पालकत्वाबाबत योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे असते. अनेकदा मुलांच्या संगोपणात काही कमतरता राहतात. अश्यावेळी जाणून घेणे महत्वाचे असते.

प्रथमच पालकत्व अनुभवताय? तुमच्या लहानग्यांसाठी 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका...
प्रातिनिधीक
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 16, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई : पालकत्वाची (parenting) भावना ही खूप खास असतेच शिवाय त्यासोबत नवीन जबाबदारीही वाढत असते. जबाबदारी आली म्हणजे, तिला योग्यरित्या पार पाडणे खूप महत्वाचे असते. पहिल्यांदाच पालकत्वचा (first time parenting) अनुभव हा काही वेगळाच असतो. परंतु त्यासोबत मनात काहीशी धाकधूकदेखील असते. आपण पालक तर झालो परंतु त्याला योग्य न्याय देउ की नाही? ही भिती मनात असतेच. पालक होणे सोपे नसते. आपले अपत्य या जगात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर काही वर्षे पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य माहितीअभावी अनेक चुका होण्याची शक्यताही असते. जे पहिल्यांदा पालक बनतात त्यांना नवजात बाळाचा (newborn baby) आहार, पोषण आणि स्वच्छता याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते, किंबहुना काही वेळा अनुभवाअभावी बहुतांश पालक रडवेलेही होतात.

स्तनपानाची विशेष काळजी घ्यावी

पहिल्यांदाच आई झाल्या असाल तर स्तनपानाबाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे असते. स्तनपान पहिल्यांदाच करत असल्याने अनेक मातांना ते करण्यात अडचणी निर्माण होत असतात. लहान मुलांना दुध ओढण्याची सवय नसल्याने पहिल्यांदा मातांना स्वत: दाबून दुध बाहेर काढून नवजात बालकाला स्तनपान करावे लागत असते. शिवाय यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत करुनच बाळाला स्तनपान करावे. घरी आल्यानंतर झोपून बाळाला दूध कधीही पाजू नये, यातून बाळाला नीट दुध पिण्यास अडचण निर्माण होत असते.

गरम पाण्याचा शेक

मातृत्वात स्तनामध्ये दूध निर्मितीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु होत असते. जर बाळाने दुध नीट पिले नाही तर, स्तनांना सूज येणे, दुधाच्या गाठी निर्माण होणे, यातून वेदणांचा त्रास सहन करावा लागत असतो. तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती आणखी बिघडली तर दुधाच्या कमतरतेचीही समस्या निर्माण होते. यासाठी कोमट पाण्याने शेक घ्यावा तसेच घरगुती उपाय म्हणून जिरे किंवा ओव्याचे पाणी पिऊ शकता.

काचेच्या बाटलीचा वापर

मुलाने पहिले 6 महिने फक्त आईचे दूध प्यावे, असे सांगितले जाते. यानंतर, जर तुम्हाला त्याला बाटलीने दुध पाजायचे असेल तर नेहमी काजेच्या बाटलीचाच वापर दुध पाजण्यासाठी करावा, प्लास्टिकच्या बाटलीतील जंतू जास्त काळ टिकतात आणि ते मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक असते.

मसाज करताना काळजी घ्या

नवजात मुलांचे अवयव अत्यंत नाजूक असतात. अनेकदा घरातील जेष्ठांना मुलांची मसाज करण्यास सांगितले जात असते. मसाज करीत असताना ती हलक्या हाताने करणे आवश्‍यक असते. मुलांचे अवयव जास्त ताणू नये, किंवा त्यावर जास्त दाबही देउ नये. मसाज रोज हलक्या हाताने केल्यास हाडे मजबूत होतात, त्याचप्रमाणे वजनही झपाट्याने वाढते.

संबंधित बातम्या

मुलांना रागावणे, धमकावणे म्हणजे शिस्त नव्हे, पालकांनो ‘या’सवयी बदला

नागपूर मनपाच्या परिवहन विभागाचा 384 कोटींचा अर्थसंकल्प; किती ई-बस होणार आपली बसच्या ताफ्यात दाखल?

Lip Care : फाटलेल्या ओठांमुळे त्रस्त आहात? मग चिंता सोडा आणि हे उपाय लगेचच करा!

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...