AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांना रागावणे, धमकावणे म्हणजे शिस्त नव्हे, पालकांनो ‘या’सवयी बदला

मुलं आपल्या मनाप्रमाणे वागली नाही म्हणून आदळ आपट करणे, त्यांना रागावणे किंवा धमकावून शिस्त लावणे म्हणजे पालकत्व नाही. यातून मुल घडण्याऐवजी अधिक बिघडतात. ‘आज तक’मध्ये प्रसिध्द केलेल्या एका लेखात पालकत्व म्हणजे नेमकं काय? याबाबत सांगताय चाइलडहूड एज्यूकेशन तज्ज्ञ चैज लेविस...

मुलांना रागावणे, धमकावणे म्हणजे शिस्त नव्हे, पालकांनो ‘या’सवयी बदला
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 11:13 AM
Share

मुंबई :  जीवनात शिस्त व वक्तशिरपणा (Dicipline) ह्या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. यातून मानसाचे उज्वल भविष्य व व्यक्तीमत्व घडत असते. त्यामुळे अगदी लहानपणापासून आपणास शिस्त लावण्याचा प्रयत्न आपल्या घरातील मोठ्यांकडून होत असतो. त्यामुळे शिस्तीचे महत्व अगदी लहान वयापासून आपणाला कळायला लागत असते. घरातील संस्कार व त्यानंतर शाळेत किंवा महाविद्यालयात गेल्यावरही वागण्याची शिस्त, बोलण्याची शिस्त, बसण्याची शिस्त आदी सर्व जीवनच शिस्तीभोवती फिरत असते. त्यामुळे आपण अनेकदा पालकत्वामध्ये (Parenting) ओढून ताणून शिस्तीला आणत असतो. आपल्या पाल्यानेही शिस्तीतच सर्व गोष्टी कराव्यात असा आपला कल असतो. निर्विवादपणे शिस्तीला महत्व आहेच परंतु, काही वेळा याचा अतिरेक होत असतो. शिस्त लावण्याच्या प्रयत्नात आपण लहान मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावतोय का? हा विचार प्रत्येक पालकाने आता करण्याची वेळ आली आहे. मुलांना रागावणे, धमकावणे (Bullying) तसेच आदळ आपट करुन आपले म्हणणे त्यांच्यावर लादणे म्हणजे शिस्त नाही. तर त्यांच्या भावना समजून चर्चेतून त्यांची समजूत घालून चांगल्या वाईटाची जाणीव करुन देणे म्हणजे पालकत्व असते.

चाइल्डहुड एज्युकेशन तज्ज्ञ चैज लेविस म्हणतात की, मुलांना शिस्त शिकवण्यात अनेक लोक चुका करतात. मुलांना काहीही शिकवण्यापूर्वी पालकांनी स्वत:मधील काही गोष्टी सुधारायला हव्यात. मुले जे पाहतात तेच शिकतात. अशा परिस्थितीत तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवले तरच मुल त्यातून काही बोध घेतील. मुलांना शिस्त शिकवणे खूप महत्वाचे आहे.

शिस्तीमुळे मुलांच्या सवयी सुधारतात. मुलांना वारंवार रागावण्यापेक्षा त्यांना चांगले वागणे शिकवावे. जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे पण बरेच लोक मुलांवर शिस्त लादायला सुरुवात करतात, त्यामुळे मुले शहाणे होण्याऐवजी अधिकच बिघडू लागतात. चैज लेविस हे त्याच्या इंस्टाग्रामवर पालकत्वाविषयी अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असतात. ‘याहू लाइफ’शी बोलताना चैज लेविस यांनी सांगितले की, मी मॉन्टेसरी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली, हा माझ्यासाठी खूप चांगला शिकण्याचा अनुभव होता. पण भीती किंवा नियंत्रण हे तंत्र मुलांना शिस्त लावण्याचा योग्य मार्ग नाही हे माझ्या लक्षात आले.

मुलांचे निरीक्षण करा

चैज लेविस सांगतात की, मुलांना सतत धाकात ठेवण्यापेक्षा मुलांचे सतत निरीक्षण केले पाहिजे. त्यांचे वागणे, बोलणे, एखाद्या विषयाची त्यांची गोडी, तसेच एखाद्या गोष्टीचा तिटकारा आदींचा अभ्यास करुन त्यांचा कल कोणत्या दिशेने आहे याची पाहणी केली पाहिजे. आपल्या मुलाला कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, कुठल्या गोष्टी तो आवडीने करतोय, याचे निरीक्षण होणे गरजेचे असते. तसेच पालकांनी स्वत:च्या भावनांना आवर घालणे महत्वाचे असते. आपली मते मुलांवर लादण्यापेक्षा त्यांच्याही मताचा आदर करायला शिकले पाहिजे.

मुलांशी संवाद साधा

अनेकदा माता- पिता व पाल्य यांच्यात संवादच होत नाही. त्यामुळे त्यांच्यातील दरी अधिकच खोल होत असते. आधीच दोघांमध्ये वयाचे बरेच अंतर असल्याने यातून मतभेद, दोन टोकांची विचारसरणी आदी समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे मुलांसोबत जास्तीत जास्त संवाद साधणे आवश्‍यक असते. यातून त्यांच्या मनातील भावना पालकांना समजतात. व याचा परिणाम म्हणून दोघांमधील नाते अजून घट्ट होण्यास मदत मिळत असते. त्यामुळे संवाद साधणे हा मुलांना शिस्त लावण्यासाठीचा एक चांगला मार्ग म्हणता येईल.

संबंधित बातम्या :

Lip Care : फाटलेल्या ओठांमुळे त्रस्त आहात? मग चिंता सोडा आणि हे उपाय लगेचच करा!

चेन्नईला जाण्याचे नियोजन आहे; मग या पर्यटन स्थळांना आवश्य भेट द्या

झोपण्यापूर्वी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, शरीराला होईल मोठे नुकसान…

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.