AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honey | मधाचा गोडवा भावतोय? अतिसेवनामुळे शरीरावर होतात घातक परिणाम..

मध हे शरीरासाठी लाभदायक समजले जाते. परंतु त्याचा अतिरेक केला, गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा मोठा दुष्परिणामही शरीरावर होत असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात मधाचा वापर केल्यास त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतात.

Honey | मधाचा गोडवा भावतोय? अतिसेवनामुळे शरीरावर होतात घातक परिणाम..
गोडवा असलेले मध
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 12, 2022 | 12:24 PM
Share

शरीराच्या अनेक समस्यांसाठी मध (Honey) हे अत्यंत गुणकारी ठरत असते. शरीराच्या आतील पोषणासाठीच नव्हे तर, केसांच्या समस्यांवरदेखील फार पूर्वीपासून मधाचा वापर केला जात असतो. मधाचे रोज प्रमाणामध्ये सेवन केल्यास त्याचे शरीराला अनेक चमत्कारी फायदेखील मिळत असतात. परंतु अनेकदा आपण मधाच्या गोडव्याला भूलतो. त्याचा अतिरेक करीत असतो. यामुळे त्याचे आपल्या शरीराला फायदे तर नाहीच परंतु नुकसान अधीक होत असते. त्यामुळे मधाचा आपल्या आहारात प्रमाणापेक्षा जास्त वापर व्हायला नको, याचा दुष्परिणाम (Disadvantages) म्हणून वजन वाढणे, लठ्ठपणा, मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब, दात खराब होणे अशा अनेक समस्या निर्माण होत असतात. मध हे आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. पण कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. जर तुम्ही जास्त प्रमाणात मधाचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्यापासून होणार्‍या दुष्परिणामांबद्दल माहिती असायला हवी, या लेखातून ती जाणून घेउ या.

लठ्ठपणाची समस्या

मधाचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास वजन वाढून आपणास लठ्ठपणाची समस्या जाणवू शकते. मधामध्ये साखरेपेक्षा गोडपणा कमी असला तरी त्याचे अतिसेवन केल्याने लठ्ठपणा व त्यातून अनेक व्याधी जडू शकतात.

मधुमेह

मध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु तज्ज्ञांच्या मते, जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर ते शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवू शकते. अशा स्थितीत दिवसभरात मध मर्यादित प्रमाणात खावे, त्याचा अतिरेक केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून आपल्याला मधुमेहदेखील होउ शकतो.

दातांवर वाईट परिणाम

मध हे आधीच गोड असते. त्यात त्याचे अतिरिक्त सेवन केल्याने त्याच्या गोडपणामुळे तोंडात बॅक्टेरियाची समस्या निर्माण होउ शकते. बॅक्टेरियाचा दातांवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे तोंडातून दुर्गंधी देखील येऊ शकते, दात किडतात.

पचनावर परिणाम

मधाचे जास्त सेवन केल्याने पचनसंस्थेवर त्याचा विपरित परिणाम होतो. यामुळे पोटदुखी आणि इतर समस्या निर्माण होतात. मधात गोडवा असल्याने ते जास्त प्रमाणात पोटात गेले तर जुलाब तसेच लहान मुलांच्या पोटात किरींग निर्माण होत असतात. त्यामुळे त्याचा अतिरेक टाळून ते प्रमाणात खावे.

उच्च रक्तदाब

ज्यांना आधीच मधुमेह व उच्च रक्तदाबाची समस्या असेल अशांनी मधापासून आधीच दूर रहावे, यातून त्यांच्या समस्यात अधीक भर पडू शकते. मधाच्या गोडवा जास्त असतो. मग त्यातून लठ्ठपणा, मधुमेह नंतर रक्तदाबाची समस्या वाढत असते. त्यामुळे मधाचे प्रमाणातच सेवन करणे फायद्याचे ठरते.

संबंधित बातम्या :

Split Ends Treatment| दुभंगलेल्या केसांमुळे आहात त्रस्त? घरातील या 5 गोष्टी ठरतील वरदान, आजच वापरून पाहा

Skin Care : डी-टॅन पॅक घरी बनवायचा आहे का? मग ही खास पध्दती फाॅलो करा आणि तजेलदार त्वचा मिळवा!

अॅपल सायडर व्हिनेगरमुळे कोंड्याची समस्या झटपट दूर होईल! तुम्हाला माहीत आहे कसे?

Follow Us
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...