AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेच्या समस्यांवर हे घरगुती उपाय ठरतील लाभदायक, आजच ट्राय करा…

त्वचेवर खाज सुटणे जळजळ होणे. तासंतास खाज सुटल्यानंतर तीव्र वेदना होणे, हवामान बदलल्यावर त्वचेवर त्याचा परिणाम जाणवत असतो. खाज येण्याबरोबरच काही वेळा त्वचेसंबंधित विविध अॅलर्जीचाही सामना करावा लागतो, अंगावर लाल चट्टे पडतात.

त्वचेच्या समस्यांवर हे घरगुती उपाय ठरतील लाभदायक, आजच ट्राय करा...
पारंपारिक आयुर्वेदीक उपचार पध्दतींमध्ये त्वचेच्या समस्यांबाबत अनेक घरगुती उपाय करता येतात.
| Updated on: Feb 12, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई : हवामान बदलले (Weather Changed) की, त्याचा परिणाम नेहमी आपल्या त्वचेवर जाणवत असतो. या शिवाय चुकीच्या खानपान पध्दतीने, कृत्रिम बाहेरील प्रोडक्ट, शरीरातील हार्मोन्स आदींचा परिणाम आपल्या शरीरावर व खासकरुन आपल्या त्वचेवर दिसून येतो. अशा वेळी अंगाला तीव्र खाज सुटते, लाल रंगाचे चट्टे पडणे, वळखण दिसणे, त्वचेची आग होणे हे (Skin Allergy) अॅलर्जीचे सामान्य लक्षणे दिसून येत असतात. कधीकधी लाल पुरळ येण्यामागे चुकीचे तेल किंवा क्रीम वापरणे देखील कारण असू शकते. यापासून मुक्त होण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याने घरगुती उपायदेखील (Home Remedies) चाचपडून पाहता येतात. अनेकदा त्वचेशी संबंधित समस्यांबाबत आपण कृत्रिम उपाय योजना करीत असतो. परंतु यातून काहीच साध्य होत नाही. पारंपारिक आयुर्वेदीक उपचार पध्दतींमध्ये त्वचेच्या समस्यांबाबत अनेक घरगुती उपाय योजना सांगितल्या आहेत. त्याच्या वापरातूनही आपण या समस्यांना मुळापासून नष्ट करु शकतो.

वातावरणाचा परिणाम

वातावरणातील बदल, प्रदूषण किंवा चुकीचा आहार, पालेभाज्या, फळे, सुकामेवा, संपूर्ण धान्य आदींची कमतरता यामुळे त्वचेला खाज येण्याबरोबरच काही वेळा अॅलर्जीचाही सामना करावा लागतो. हवामानातील थोडासा बदल किंवा धूळ आणि मातीचा परिणाम लगेच त्वचेवर व केसांवर दिसून येत असतो. हवामान थंड असो किंवा गरम, पहिला परिणाम त्वचेवरच दिसून येतो. या लाल पुरळांमुळे अनेकदा त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होऊ लागते.

खोबरेल तेल

खोबरेल तेल हे त्वचेसाठी अत्यंत प्रभावी आहे. त्वचेला ‘हायड्रेड’ ठेवण्यासाठी खोबरेल तेल गुणकारी ठरते. यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे त्वचेवरील अॅलर्जी दूर करण्याची क्षमता असते. तेलामुळे त्वचेला आवश्‍यक ते सर्व पोषक घटक मिळत असतात. डॉक्टर देखील त्याचा वापर करण्याची शिफारस करतात. त्वचेवर लाल पुरळ उठण्याची समस्या असेल तिथे खोबरेल तेल प्रभावी ठरु शकते. लाल पुरळ असलेल्या भागाला हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.

कोरफड

कोरफड हे त्वचा, केस आदींसाठी गुणकारी मानले जाते, अनेक जण कोरफडीचा रस पितात, यातून पोटासंबंधित सर्व आजार नाहिसे होतात. कोरफड त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. त्वचेला खाज सुटणे आणि अॅलर्जी व्यतिरिक्त, कोरफडमुळे त्वचा चमकदार आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत मिळत असते. तुम्ही फक्त कोरफडीची जेल मॅश करा आणि प्रभावित भागावर लावा आणि काही मिनिटांनंतर ते साध्या पाण्याने काढून टाका. असे केल्याने अॅलर्जी बर्‍याच प्रमाणात दूर होऊ शकते.

तुळशी

तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे त्वचाच नाही तर पोटही निरोगी ठेवता येते. त्वचेसाठी त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात मध घाला. तुळशीच्या पानांची पेस्टही त्वचेवर लावू शकता. त्वचेवरील लालसरपणा, खाज सुटणे आणि जळजळ होणे या समस्या तत्काळ दूर झालेल्या दिसतील.

संबंधित बातम्या :

Split Ends Treatment| दुभंगलेल्या केसांमुळे आहात त्रस्त? घरातील या 5 गोष्टी ठरतील वरदान, आजच वापरून पाहा

Skin Care : डी-टॅन पॅक घरी बनवायचा आहे का? मग ही खास पध्दती फाॅलो करा आणि तजेलदार त्वचा मिळवा!

अॅपल सायडर व्हिनेगरमुळे कोंड्याची समस्या झटपट दूर होईल! तुम्हाला माहीत आहे कसे?

काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने.
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.