AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Split Ends Treatment| दुभंगलेल्या केसांमुळे आहात त्रस्त? घरातील या 5 गोष्टी ठरतील वरदान, आजच वापरून पाहा

दुतोंडी केसांची समस्या अगदी सामान्य आहे. निर्जीव केसांना पुन्हा दाट व चमकदार बनविण्यासाठी घरगुती गोष्टींचा वापर केला जाउ शकतो. यातून केसांवर कृत्रिम रसायनांचा मारा करण्याची गरजही पडणार नाही.

Split Ends Treatment| दुभंगलेल्या केसांमुळे आहात त्रस्त? घरातील या 5 गोष्टी ठरतील वरदान, आजच वापरून पाहा
hair
| Updated on: Feb 12, 2022 | 10:09 AM
Share

मुंबई : वाढते प्रदुषण (Pollution) तसेच धुळ- माती, क्षारयुक्त पाणी आदींमुळे केसांच्या समस्या (Hair problems) निर्माण होत आहे. त्याच पध्दतीने चुकीच्या आहारातूनही केंसांच्या वाढीसाठी जे पोषक घटक शरीराला मिळायला हवे ते मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आपले केस निर्जीव होत आहेत. त्यांची वाढ खुंटली आहे. केसांत कोंडा होणे, चमक जाणे त्याच प्रमाणे केसांमध्ये गुंता होणे या सामान्य समस्या आहेत. परंतु महिलांना सर्वाधिक त्रस्त करणारी समस्या म्हणजे, दुतोंडी केस. (hair Split Ends) केसांची टोक फाटून दोन टोके तयार होतात, त्याला दुतोंडी केस म्हणतात. याचा सर्वाधिक दुष्परिणाम म्हणजे यातून केसांची वाढ खुंटत असते. केसांना योग्य पोषण मिळत नसल्यास दुतोंडी केसांची समस्या निर्माण होत असते. यावर बाहेरील कृत्रिम प्रोडक्ट न वापरता अगदी घरातील गोष्टींचा वापर करुनदेखील या समस्येवर मात करता येते.

प्रदुषणाचा केसांवर परिणाम

धूळ- माती तसेच अन्य प्रदुषणामुळे केसांवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असतो. शिवाय रोजच्या वापरात केमिकल्सच्या उपयोग केल्यामुळे केसांना अनेक समस्या निर्माण होऊ लागतात, त्यापैकीच एक म्हणजे केस फाटलेले टोक. ते एका वेळी निर्जीव होतात आणि त्यांना कापून त्यांची पुन्हा वाढ होण्याची वाट बघावी लागत असते. घरगुती उपायांचा अवलंब करून, दोन दुतोंडी केसांपासून मुक्तता मिळवता येते.

1) अंड्यातील पिवळ बलक

अंड्याचा पिवळा भाग एका भांड्यात चांगला फेटून घ्यावा आणि त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घाला. हे मिश्रण केसांमध्ये 35 ते 40 मिनिटे ठेवा. हे मिश्रण केसांमधून काढताना फक्त कोमट पाणी वापरावे, यातून केसांवर चांगले बदल जाणवतील.

2) कोरफडीचा गर

कोरफडीचा गर फक्त त्वचेसाठीच नाही तर त्याहून जास्त केसांसाठीही फायदेशीर आहे, केस मऊ करण्यासाठी कोरफडीचा वापर पूर्वीपासून करण्यात येत आहे. यामुळे केसांमध्ये साचलेली घाण निघून जाते आणि ते निरोगीही होऊ होतात. कोरफड लावल्यानंतर केस धूतांना फक्त थंड पाण्याचा वापर करावा.

3) मध

दुतोंडी केस घालवण्यासोबतच केसांना ‘हायड्रेट’ ठेवण्यासाठी देखील मध प्रभावी आहे. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात तीन चमचे मध मिसळा. केसांना कंडिशनर म्हणून मधाचे पाणी लावा, यातून सकारात्मक बदल दिसून येतील.

4) खोबरेल तेल

खोबरेल तेल हे दुतोंडी केसांसाठी अत्यंत प्रभावी आहे. याचा वापर करण्यासाठी खोबरेल तेल गरम करून डोक्याला मसाज करावे. यातून दुतोंडी केसांची समस्या मुळापासून नष्ट हेाउन केस चांगले वाढीस लागतील.

5) पिकलेली पपई

आरोग्यासाठी अतिशय लाभदायी मानली जाणारी पपई केसांची निगा राखण्यातही चांगली आहे. पपई कूस करून त्यात दही घालून केसांना लावा. हे मिश्रण लावल्यानंतर 15 मिनिटांनी डोके पाण्याने धुवावे यातून केसांची चमक वाढीस लागते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Relationship | तुमच्या पार्टनरमध्ये अशाप्रकारची लक्षणे दिसतात, याचा अर्थ तुमचे नाते लवकरच संपणार!

प्री-वेडिंग शूटसाठी ‘आउटफिट’च्या शोधात आहात? हे नक्की ट्राय करा..

Beauty care: चेहऱ्याच्या समस्या पटकन दूर करतं तमालपत्र! कसा करावा उपयोग? जाणून घ्या!

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.