जोडीदाराला आनंदी ठेवाचंय मग ‘या’ गोष्टी टाळाच; अन्यथा नात्यामध्ये निर्माण होऊ शकतो दुरावा

| Updated on: Jan 22, 2022 | 6:45 AM

जसजसं नातं जुनं होत जातं तसतसे आपल्या जोडीदाराचे असे पैलू समोर येतात, ज्याची तुम्ही अपेक्षा देखील केलेली नसते. त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होते. यातून अनेकदा भांडणे देखील होताता. हळूहळू नाते कमकुवत होऊ लागते. असे जर होऊ द्यायचे नसेल तर काही गोष्टी टाळणे फायद्याचे असते.

जोडीदाराला आनंदी ठेवाचंय मग या गोष्टी टाळाच; अन्यथा नात्यामध्ये निर्माण होऊ शकतो दुरावा
Zodiac behavior
Follow us on

लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोडपे (Couples) अनेकदा त्यांचे सकारात्मक पैलू त्यांच्या जोडीदारांसमोर ठेवतात आणि यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मकता राहते. नात्यातील (Relationships) गोडव्यामुळे प्रेमही पुरेसं राहतं, पण जसजसं नातं जुनं होत जातं तसतसे आपल्या जोडीदाराचे असे पैलू समोर येतात, ज्याची तुम्ही अपेक्षा देखील केलेली नसते. त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होते. यातून अनेकदा भांडणे देखील होताता. हळूहळू नाते कमकुवत होऊ लागते. गोष्ट घटस्फोटापर्यंत (Divorce) देखील जाऊ शकते. अनेकदा जोडपे आपल्या जोडीदारावर संशय घेऊ लागते. मात्र अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण टाळल्या तर तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल संशय निर्माण होणार नाही, तुमचे नाते अधिक मजबूत होण्यास मदत होईल. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

सतत घराच्या बाहेर राहणे

अनेकदा तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर पटत नसते. छोट्या-छोट्या कारणांवरून खटके उडतात. मग अशावेळी तुम्ही एक पर्याय म्हणून अधिकाधिक घराच्या बाहेरच राहणे पसंत करतात. तुम्हाला घराच्या बाहेर अधिक वेळ घालवण्याची सवय जडते. मात्र अशी सवय ही तुमच्यामधील नातेसंबंधाला अधिक हानिकारणक असते. कारण तुम्ही जेवढा वेळ घराच्याबाहेर राहाता तेवढा तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेऊ शकतो. यातून तुमच्या नात्यामधील अंतर आणखी वाढू शकते.

सतत रागात असणे

तुम्हाला अनेक गोष्टींचे टेन्शन असू शकते. ऑफीसमध्ये दरदिवशी काहीना काही घडामोडी घडत असतात. तसेच घरी देखील जोडीदाराबारोबर छोटे-मोठे वाद होतात. यातून तुमच्यामध्ये नकळत चिडचिडेपणा येतो. तुम्ही जर सतत राग व्यक्त करत राहिले तर तुमच्या जोडीदाराला तुमच्याबद्दल शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे असे न करता ऑफीसमधून घरी आल्यानंतर तुमच्या जोडीदाराशी प्रेमाने वागा, तिची विचारपूस करा असे केल्यास तुमच्या नात्यातील प्रेम आणखी वाढू शकते.

मोबाईलचा अतिवापर

सध्याचा जमाना हा डिजिटल जमाना आहे, त्यामुळे तुम्ही मोबाईचा वापर टाळू शकत नाहीत. मात्र मोबाईल वापरण्यावर नियंत्रण हवे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ न देता जर सतत मोबाईलवरच व्यस्त असाल तर तिच्या किंवा त्याच्या मनात तुमच्याबद्दल संशय व्यक्त होतो. तसेच अनेक जण आपल्या जोडीदारापासून आपला मोबाईल सुरक्षीत ठेवतात. हे देखील संशय निर्माण होण्यासाठी मोठे कारण असून शकते.

खोटे बोलणे

नात्यामध्ये दुरावा निर्माण करणारं हे सर्वात मोठं कारण आहे. एक लक्षात ठेवा परिस्थिती कशी असू द्या, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नेहमी खरेच बोला. कधीही खोटे बोलू नका. सत्य कधीना कधी बाहेर येतेच. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुम्ही खोटे बोलत आहात हे कळते, तेव्हा त्याचा किंवा तिचा तुमच्यावरील विश्वास कमी होतो.

संबंधित बातम्या

तुम्हाला आई व्हायचंय?… वंध्यत्व समस्यांवर करा सहज अत्याधुनिक उपचाराने मात!

तुम्हालाही सामान्य व्यक्तीपेक्षा थंडीचा अधिक त्रास होतो?; तर असू शकतो ‘हा’ आजार

डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान ? जाणून घ्या नेमकं कारण