आयुष्यात या 5 चुकांपासून स्वतःला दूर ठेवा, नाहीतर होऊ शकते नुकसान 

प्रत्येकाला कधी ना कधी पश्चाताप होतो. आपली एखादी चूक कळत नकळतपणे आपल्याला सतत मानसिक त्रास देते. जर यशस्वी व्यक्तींच्या जीवनात डोकावले तर त्यांनाही त्यांच्या चुकीच्या निर्णयावर पश्चाताप होतो. असे प्रत्येकाच्या बाबतीत नक्की होऊ शकते.

आयुष्यात या 5 चुकांपासून स्वतःला दूर ठेवा, नाहीतर होऊ शकते नुकसान 
आकड्यांचा गोलमाल की खरखुरं चित्र, जाणून घ्या बेरोजगारी दराविषयीचं नेमकं वास्तव
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 6:54 PM

7 habits can give you Regrets of life : आपले काही निर्णय एकतर्फी किंवा चुकीचे असू शकतात. त्यावेळी आपल्याला कल्पनाही नसते की भविष्यात याचे परिणाम काय असू शकतात. जोपर्यंत कुणी आपल्याला ती चूक सांगत नाही. तोपर्यंत आपल्याला आपली चूक लक्षातही आली नसते. सुरुवातीला आपल्याला आपला निर्णय योग्य वाटतो. नंतर तोच निर्णय तापदायक ठरतो. पण अशा चुकांपासून आपण स्वतःला नक्कीच वाचवू शकतो. खूप लोक वारंवार त्याच चुका करतात. आज आपण अशा वारंवार होणाऱ्या चुका टाळूया. जेणेकरून भविष्यात (future) तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल (Decision) कोणताही पश्चाताप होणार नाही.

आपल्या तब्येतीविषयी असलेली उदासीनता 

अनेकांना वाटते की मला कोणता आजार नाही, म्हणजे मी माझे वाढणारे वजन किंवा अन्य कोणत्याही शारीरिक व्याधींकडे लक्ष कशाला देऊ. जेव्हा वाढलेले वजन आणि त्यातून उद्भवलेले आजार त्रास द्यायला सुरुवात करतात तेव्हा मात्र फार वाईट वाटत. जर वेळीच लक्ष देऊन वजन आणि स्वतःवर नियंत्रण ठेवले असते तर ही समस्या तेव्हाच आटोक्यात आली असती. असा विचार नंतर करण्यापेक्षा आपल्या तब्येतीकडे अगदी सुरुवातीपासूनच लक्ष द्या.

बालपणीच्या मित्रांपासून दूर होणे

शाळेतल्या मित्राची प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी जागा असते. नंतर करिअरची निवड करताना एकमेकांची साथ सुटते आणि हा निर्णय खूप अवघड जातो. तरीही सुरुवातीला आपण एकमेकांच्या संपर्कात राहतो. नंतर अभ्यास, ट्युशन यामध्ये दोघेही व्यस्त होतात. अशावेळी वाटते की पहिलेचेच दिवस बरे होते. आपण किमान एकमेकांच्या सानिध्यात असायचो. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा तुम्ही सुरूवातीपासूनच संपर्क कायम ठेवा. कितीही व्यस्त असला तर मित्रांसाठी वेळ काढा आणि मैत्री टिकवा.

खऱ्या प्रेमाला विसरून जाणे

होय ही सुद्धा तुमची एक चूक ठरू शकते. खूप जणांना विचारले तर ते नक्की सांगतील की आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही तुमच्यावर खूप प्रेम करणार्या व्यक्तीला सोडून दिले. गैरसमज किंवा एखादे टेन्शन यामुळे असे होऊ शकते. पण जेव्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाते तेव्हा मात्र तुम्हाला स्वतःचा राग येतो. पश्चाताप होतो. त्यापेक्षा स्वतःचे रिलेशनशिप अशा वळणावर आणूच नका की ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल.

योग्य वेळी बचत न करणे

होय ही चूक खरच खूप नुकसान करणारी ठरू शकते. नोकरी लागल्यानंतरही अनेकांना बचत न करण्याची सवय असते. नंतर मात्र वेळीच बचत न केल्याचा पश्चाताप होतो. अगदी छोट्या-छोट्या बचतीने सुरूवात केली असती तर भविष्यात मोठी बचत झाली असते असे सारखे वाटते. त्यामुळे सुरुवातीपासूनच बचतीची सवय ठेवा.

स्वतःवर विश्वास नसणे

आपल्यापैकी अनेक जण स्वतःवर अजिबात विश्वास ठेवत नाही. हेच कारण असते की ती जीवनात काही खास करू शकत नाही. स्वतःवर विश्वास नसल्याने ती जबाबदारी टाळतात किंवा काम टाळतात. नंतर त्यांना जाणीव होते की स्वतःवर विश्वास ठेवून पाऊल उचलले असते तर आज ते काही वेगळे करू शकले असते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे सोडू नका.

संबंधित बातम्या 

तुम्हाला आई व्हायचंय?… वंध्यत्व समस्यांवर करा सहज अत्याधुनिक उपचाराने मात!

20 दिवस झाले अजूनही लक्षणं दिसतात आहे कोरोनाची..? सावधान तुम्हाला असू शकतो लॉन्ग कोविड..!

फोनचा अतिवापर करताय? सोशल मीडियापासून निवांतपणा हवा असेल तर त्यासाठी खास 10 टीप्स

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.