येथे पान खाऊन वधू वराला निवडते, अनोखी प्रथा हजारो वर्षांपासून सुरु
विवाहाचा लगीनगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. परंतू अनेक आदिवासी आणि जाती समुहात महिलांना आपला जीवनाचा साथीदार निवडण्याचा संपूर्ण अधिकार असतो. चला तर पाहूयात काय आहे नेमकी प्रथा....
असे म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही लाख वधू – वर संशोधन करा किंवा प्रेम विवाह करा तुमचे सगळे जुळल्या शिवाय लग्न काही होत नाही. सर्व गुण जुळून यावे लागतात. विवाहाच्या जगभर वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. विवाहाच्या देखील वेगवेगळ्या परंपरा आहेत. परंतू एका राज्यात मुली पान खावून तिचा भावी साथीदार निवडतात असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. बिहारच्या काही भागात अशा प्रकारची प्रथा आहे. या परंपरेत मुली पान खाऊन आपल्या जीवनाचा साथीदार निवडतात. काय आहे ही विचित्र प्रथा पाहूयात…
पानाचे महत्व
खाऊचे पानाला महत्व खूप आहे. मुखशुद्धीसाठी आपल्या येथे नेहमीच पान खाल्ले जायचे. भारतात जेवणानंतर आर्वजून पान खाल्ले जायचे. त्यामुळे जेवण पचन देखील व्हायचे. जर कोणताही मुलगा कोणा मुलीला पान देत असेल आणि तिने ते स्वीकारले तर याचा अर्थ ती मूलगी या मुलाला पसंद करतेय आणि त्याच्याशी लग्न करायला तयार आहे.
कशी असते परंपरा…
या परंपरेत तरुण आणि तरुणींचा मेळावा भरतो. आणि त्यानंतर मुलगा आपल्या आवडत्या मुलीला पान देतो. जी मुलगी त्याचे पान स्वीकारते आणि खाते तिला तो वर पसंद आहे म्हणून त्यांचे लग्न लावून दिले जाते. ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरु असून आजही सुरु आहे. ही परंपरा खूप जुनी आहे.आदिवासी समुहाकडून ती पुढे चालत आली आहे. या समुदायात लग्नाच्या प्रथा वेगळ्या आणि विचित्र आहेत. आजच्या काळात विवाह ठरवून न होता लव्ह मॅरेजचे चलन वाढले आहे. तरी बिहरात मात्र ही परंपरा अजूनही जीवंत आहे.