मुलं हुशार व्हावीत असं वाटतं ना? मग त्यांना आहारात ‘हे’ पदार्थ नक्की द्या…

| Updated on: Jun 06, 2021 | 2:28 PM

लहान मुलांचा आहाराची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. हेल्दी आहार स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते.

मुलं हुशार व्हावीत असं वाटतं ना? मग त्यांना आहारात हे पदार्थ नक्की द्या...
हेल्दी आहार
Follow us on

मुंबई : लहान मुलांच्या आहाराची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. हेल्दी आहार स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते. मेंदू आपल्या शरीराच्या इतर भागाप्रमाणेच आपण खात असलेल्या अन्नातील पोषकद्रव्ये घेतो. म्हणूनच, मुलांना अधिक पौष्टिक आहार दिला पाहिजे. लहान मुलांच्या आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे पाहा. (Include these foods in children’s diets)

अंडी

मुलांना नाश्त्यामध्ये अंडी दिली पाहिजेत. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात. हे स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करते.

ऑयली फिश

ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे ऑयली फिशमध्ये जास्त असते. हे मेंदूच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सॉल्मन, मॅकेरल, फ्रेश ट्युना, ट्राउट, सार्डिन आणि हेरिंग सारख्या माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड जास्त असते. मुलांच्या आहारात आठवड्यातून एकदा फिशचा समावेश केला पाहिजे.

ओट्स

मुलांच्या आहारात ओट्सचा समावेश करणे चांगले आहे. ओट्स हे मेंदूसाठी उर्जेचे चांगले स्रोत आहे. त्यामध्ये फायबर जास्त प्रमामात असते. ओट्समध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स आणि जस्त देखील असते. ज्यामुळे मुलांचा मेंदू चांगला होतो. आपण सफरचंद, केळी, ब्लूबेरी आणि बदाम यांचा ही मुलांचा आहारात समावेश करा.

डार्क चॉकलेट

मुलांना चाॅकलेट खाण्यासाठी आवडते. अशावेळी आपण त्यांना इतर चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट खाण्यासाठी दिले पाहिजे. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात. ते आपल्या शरीरातील ताण कमी करू शकतात. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यानेही नुकसान होऊ शकते.

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडोला एक सुपर फूड देखील म्हटले जाते, जे ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, फायटोकेमिकल्स, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. अ‍व्होकाडोमध्ये पोटॅशियमही असते. यामुळे मुलांच्या दररोजच्या आहारात अ‍ॅव्होकॅडोचा समावेश करा

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असते. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे मुलांच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश हा केला पाहिजे. आहारात टोमॅटो, रताळे बटाटे, भोपळा, गाजर याचाही समावेश करा.

दूध, दही आणि चीज

दूध, दही आणि चीजमध्ये प्रथिने आणि बी जीवनसत्त्वे जास्त असतात, जे मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटर आणि एंजाइमच्या विकासासाठी आवश्यक असतात, या पदार्थांमध्ये कॅल्शियम देखील जास्त असते, जे मजबूत आणि निरोगी दात आणि हाडे विकसित करण्यासाठी आवश्यक आहे. यामुळे मुलांच्या आहारात दूध दही आणि चीजचा समावेश करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Include these foods in children’s diets)