रोजच्या ब्रेकफास्टमध्ये ‘या’ आरोग्यदायी पदार्थांचा करा समावेश
दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी आरोग्यदायी नाश्ता करणे आवश्यक आहे. योग्य नाश्त्यामुळे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते. चला, आपल्या नाश्त्यामध्ये कोणत्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊयात.

सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसाचा पहिला आहार असतो आणि म्हणूनच तो तुमच्या आरोग्यासाठी आणि दिवसभरातील ऊर्जेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रात्रभर काहीही न खाल्ल्यानंतर शरीराला पुन्हा ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. एक संतुलित आणि पौष्टिक नाश्ता शरीराला दिवसभर काम करण्याची शक्ती देतो आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतो. मात्र, नाश्ता न केल्यास किंवा तळलेले व गोड पदार्थ खाल्ल्यास लवकर भूक लागणे, थकवा येणे आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते.
प्रत्येक व्यक्तीचे वय आरोग्य आणि आहाराच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरी असे काही पदार्थ आहेत जे बहुतेक लोकं त्यांच्या नाश्त्यामध्ये समाविष्ट करू शकतात . या पदार्थांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आरोग्यदायी फॅट यांसारखी पोषक तत्वे असतात. जी केवळ शरीराचे पोषणच करत नाहीत, तर शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यासही मदत करतात. दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी योग्य नाश्ता हा एक सोपा मार्ग असू शकतो. चला तर मग नाश्त्यामध्ये कोणते आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट करणे फायदेशीर मानले जाते आणि कोणते टाळावेत हे जाणून घेऊयात.
नाश्त्यामध्ये कोणत्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा?
हेल्थलाइननुसार नाश्त्यासाठी असे पदार्थ निवडावेत जे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वे देतील. तर नाश्त्यात अंड्यांचा समावेश करा. कारण अंडीमध्ये प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतात. तसेच तुम्ही ओट्सचा देखील समावेश करू शकता. ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनक्रियेस मदत करते. त्यासोबत दही किंवा ग्रीक योगर्टमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असतात, जे हाडे आणि स्नायूंसाठी फायदेशीर असतात.
केळी, सफरचंद आणि बेरी यांसारखी हंगामी फळे शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवतात. बदाम, अक्रोड आणि चिया सीड्स यांसारख्या सुकामेवा आणि बियांमध्ये आरोग्यदायी फॅट आणि फायबर असतात. संपूर्ण धान्याचे ब्रेड किंवा टोस्ट हे देखील चांगले पर्याय आहेत. या पदार्थांचा समावेश असलेला संतुलित नाश्ता शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे पुरवू शकतो आणि तुम्हाला दिवसभर सक्रिय राहण्यास मदत करतो.
नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
नाश्त्यामध्ये साखर, मीठ किंवा अनहेल्दी पदार्थ तसेच जास्त फॅट असलेले पदार्थ टाळा. पेस्ट्री, डोनट्स, कुकीज, केक आणि अति गोड पेयं व शीतपेये यांमधून फारसे पोषण मिळत नाही. तळलेल्या पदार्थांमुळे सकाळी पोट जड झाल्यासारखे वाटू शकते.
याव्यतिरिक्त केवळ चहा किंवा कॉफी पिण्यासाठी नाश्ता न करणे ही देखील चांगली कल्पना मानली जात नाही. नाश्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराला उत्तम पोषण मिळते आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)