AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विसरभोळ्या कर्मचार्‍यांसाठी EPFO चे ‘ब्रह्मास्त्र’! E-PRAAPTI पोर्टलवरून झटपट मिळेल पीएफचा पैसा

EPFO E PRAAPTI Portal Launch: ईपीएफओने विसरभोळ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आणली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत E-PRAAPTI पोर्टल लाँच होईल. यामुळे जुन्या आणि निष्क्रिय पीएफ खात्यातील अडकलेली 9,330 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

विसरभोळ्या कर्मचार्‍यांसाठी EPFO चे 'ब्रह्मास्त्र'! E-PRAAPTI पोर्टलवरून झटपट मिळेल पीएफचा पैसा
ईपीएफओ ई प्राप्ती पोर्टल
| Updated on: Aug 06, 2026 | 4:00 PM
Share

अनेकदा नोकरी बदलल्यानंतर लोक त्यांचे जुने पीएफ (PF) खाते नवीन कंपनीत हस्तांतरीत करणे विसरतात. अथवा काहींचे खाते निष्क्रिय होते. त्यामध्ये पीएफ योगदान अडकते. कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यातील पैसे अडकलेले आहेत. केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) त्यावर तोडगा शोधला आहे. ऑगस्टपर्यंत एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म EPFO E-PRAAPTI Portal Launch करण्यात येणार आहे. हे पोर्टल विशेष करून जुनी खाती आणि बंद पडलेली खाती पुन्हा सक्रिय करण्यात मोलाची भर घालेल. ज्यांची खाती सध्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी (UAN) लिंक नाहीत, त्यांना पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल. जुन्या आणि निष्क्रिय पीएफ खात्यातील अडकलेली 9,330 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

EPFO E-PRAAPTI पोर्टल आहे काय?

‘EPF Aadhaar-Based Access Portal for Tracking Inoperative Accounts’ म्हणजे ई-प्राप्ती आहे. जुन्या आणि निष्क्रिय पीएफ खाती शोधण्यासाठी विसरभोळ्या कर्मचाऱ्यांना या पोर्टलचा वापर करता येईल. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या पोर्टलची घोषणा केली होती. हे पोर्टल या ऑगस्टच्या अखेरीस सुरू होणार आहे. त्यापूर्वी ईपीएफओ राष्ट्रीय डेटाबेस तयार करत आहे. त्यासाठी बँक आणि सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येत आहे. यासंबंधीची चाचणी करण्यात येत आहे.

आता कंपनीत जाण्याची नाही गरज

जुन्या PF खात्यातून पैसे काढण्यासाठी अथवा ही रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी सर्वात मोठी अडचण ही कर्मचारी ओळखण्याची होती. पण ई-प्राप्तीने ही अडचण दूर केली आहे.

1. आधार-बेस्ड व्हेरिफिकेशन: हे पोर्टल आधारद्वारे(Aadhaar) प्रमाणीकरण प्रणालीवर काम करते. म्हणजे जुन्या पीएफ खात्याच्या प्रमाणीकरणासाठी आधार कार्डच ओळखीसाठी महत्त्वाचे असेल.

2. कागदी कवायत संपणार: या नवीन पोर्टलमुळे यापूर्वीची मोठी कागदी कवायत संपेल. ईपीएफओ आणि जुन्या कंपनीतील एचआरकडे वारंवार फेरी मारावी लागणार नाही.

पीएफ खात्यात 9,330 कोटींहून अधिकची रक्कम अडकली

पीएफ खात्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, 30.91 लाखांहून अधिक पीएफ खाती निष्क्रिय आहेत. त्यातील कर्मचाऱ्यांचे जवळपास 9,330 कोटी रुपये अडकले आहेत. ईपीएफच्या नियमानुसार, सलग तीन वर्षे खात्यात योगदान झाले नाही तर ते खाते निष्क्रिय होते. E-PRAAPTI पोर्टलचे मुख्य उद्देश ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना परत करणे हा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना हा एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आणत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल