डेंग्यू झाल्यानंतर आहारात या गोष्टींचा करावा समावेश, झटकन होते रिकव्हरी
बदलत्या वातावरणानुसार डेंग्यूचे डास देखील आपल्याभोवती तयार होतात. डेंग्यु हा मच्छरमुळे होणारा आजार आहे. या आजारातून बरे होण्यासाठी खूप वेळ लागतो, या तापातून लवकर कसे बरे व्हायचे ते जाणून घेऊया. कोणत्या गोष्टी आहारात समावेश करायच्या ज्यामुळे लवकर रिकव्हरी होते.

Recovery Foods for Dengue Fever : दरवर्षी डेंग्यूची साथ पसरते. वातावरणात बदल झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. असाच एक आजार म्हणजे डेंग्यू. डेंग्यू झाल्यानंतर रुग्णांना खूप ताप आणि अशक्तपणाचा सामना करावा लागतो. कधीकधी यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी अनेक महिने देखील लागू शकतात. डेंग्यू झाल्यानंतर माणूस अशक्त होऊन जातो. या आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी आहार महत्त्वाचा असतो. चला तर मग जाणून घेऊया डेंग्यु झाल्यानंतर कोणत्या पदार्थाचा आहारात समावेश करावा.
1. नारळ पाणी
नारळ पाणी हा खनिजांचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. नारळ पाणीमुळे निर्जलीकरण जाणवणार नाही कारण यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन स्थिर राहते. नारळपाणी अशक्तपणा दूर ठेवते आणि शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. डेंग्यूपासून बरे होत असताना दररोज 2 ग्लास नारळाचे पाणी प्यावे.
2. ब्रोकोली
डेंग्यू झाल्यानंतर ब्रोकोलीचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. हे व्हिटॅमिन के चे समृद्ध स्त्रोत आहे. जे रक्तातील प्लेटलेट संख्या वाढविण्यात मदत करते. जेव्हा डेंग्यूने ग्रस्त लोक त्यांच्या प्लेटलेट्सच्या संख्येत घट दिसू लागतात तेव्हा ते सामान्य करण्यासाठी ब्रोकोली खावी.
3. किवी
किवी हे अत्यंत पौष्टिक तसेच महत्त्वाचे फळ आहे. डेंग्यूच्या रुग्णांसाठी ते औषधा सारखेच आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आहे, त्यासोबतच त्यात पॉलिफेनॉल आणि अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. हे अँटीऑक्सिडंट्सही रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
