‘वर्क फ्रॉर्म होम’ला कंटाळलात, निसर्गाच्या सानिध्यात बसून करा काम

| Updated on: May 13, 2021 | 9:39 AM

IRCTC ने वर्क फ्रॉर्म हॉटेल ही नवी संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. (IRCTC offers 'Work from hotel' packages)

वर्क फ्रॉर्म होमला कंटाळलात, निसर्गाच्या सानिध्यात बसून करा काम
work from hotel
Follow us on

मुंबई : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बर्‍याच क्षेत्रात ‘वर्क फ्रॉर्म होम’ ही संकल्पना राबवली जात आहे. बऱ्याच कंपन्याकडून दीर्घकाळासाठी वर्क फ्रॉर्म होमचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात अशाचप्रकारे वर्क फ्रॉर्म होमची लागू राहण्याची शक्यता आहे. मात्र अनेकजण वर्क फ्रॉर्म होमला कंटाळले आहेत. या पार्श्वभूमीवर IRCTC ने वर्क फ्रॉर्म हॉटेल ही नवी संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. (IRCTC offers ‘Work from hotel’ packages)

वर्क फ्रॉर्म हॉटेलसाठी आयआरसीटीचे पॅकेज

वर्क फ्रॉर्म होममुळे अनेक जण घरात अडकून पडले आहे. अनेकांना वर्क फ्रॉर्म होमचा कंटाळाही आला आहे. यामुळे काही जण आऊंटिंग करण्याचा प्लॅन आखत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव, इंटरनेटची सुविधा, नेटवर्कची समस्या यांसह इतर कारणामुळे यात अडचणी येत आहे. हेच लक्षात घेऊन आयआरसीटीसीने नवीन वर्क फ्रॉर्म हॉटेल ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पॅकेजही आयआरसीटीने जाहीर केले आहे.

आयआरसीटीसी केरळ शहरासाठी हे पॅकेज देत आहे. ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात, ताजेतवाने आणि आरामदायक वातावरणात काम करायचे असेल त्यांच्यासाठी हे पॅकेज फार चांगले आहे. वर्क फ्रॉर्म होमसाठी हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. पण यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील.

पॅकेजमध्ये काय?

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकंटाचा सामना करणाऱ्यांसाठी हे पॅकेजमध्ये एक सुखद पर्याय असेल. या पॅकेजनुसार केरळच्या एका हॉटेलमध्ये सहा दिवस पाच रात्रीसाठी प्रतिव्यक्ती 10 रुपये 126 आकारले जातील. एका रुममध्ये तुम्ही तीन जण राहू शकता. मात्र त्या तिघांनाही वेगवेगळे शुल्क द्यावे लागेल.यात तुम्हाला सॅनिटाईज रुम, तीन वेळेचे जेवण, दोन वेळा चहा/ कॉफी, वाय-फाय, पार्किंगसह इतर सुविधा मिळतील.

‘या’ शहरात मिळतील हॉटेल्स

केरळच्या मुन्नार, थेक्कडी, कुमारकोम, अॅलेप्पी, कोवलम, वायनाड आणि कोचीन या शहरात वर्क फ्रॉम हॉटेल ही संकल्पना राबवली जात आहे. यात शहरातील बहुतांश ठिकाणी ही सुविधा दिली जाते. त्यामुळे यातील कोणत्याही शहरात तुम्ही हॉटेलचे बुकींग करु शकता. दरम्यान सध्या केवळ पाच दिवसांसाठीच हे पॅकेज दिले जात आहे. या पॅकेजला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन ते आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (IRCTC offers ‘Work from hotel’ packages)

संबंधित बातम्या : 

तुम्हीही वर्क फ्रॉम होम करताय? मग अशी करा दीड लाखांपर्यंत बचत

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी लर्निंग फ्रॉम होम, शासनाकडून ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरु