तुम्हीही वर्क फ्रॉम होम करताय? मग अशी करा दीड लाखांपर्यंत बचत

पुढील काही महिने जर तुम्ही घरातून काम करणार असाल तर तुम्हीही चांगली बचत करु शकता. (Working From Home Can Save Your Money)

तुम्हीही वर्क फ्रॉम होम करताय? मग अशी करा दीड लाखांपर्यंत बचत
work from home
Namrata Patil

|

Apr 19, 2021 | 12:59 PM

मुंबई : कोरोना संकटामुळे बर्‍याच क्षेत्रात ‘वर्क फॉर्म होम’ या संकल्पनेतून काम केले जात आहे. यातील बऱ्याच कंपन्याकडून दीर्घकाळासाठी वर्क फॉर्म होमचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात अशाचप्रकारे वर्क फॉर्म होमची संकल्पना अशीच लागू राहण्याची शक्यता आहे. घरातून काम केल्याने लोकांना त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता येतो. त्याशिवाय बचत करण्यासाठी चांगला वेळ मिळाला आहे. खर तर अनेक लोकांनी वर्क फॉर्म होमच्या काळात होणाऱ्या बचतीच्या पैशातून लाखो रुपये जमा केले आहेत. (Working From Home Can Save Your Money)

जर तुम्हीही ‘वर्क फॉर्म होम’ करत असाल आणि पुढील काही महिने जर तुम्ही घरातून काम करणार असाल तर तुम्हीही चांगली बचत करु शकता. खरतर घरात काम केल्याने अनेकांचा खर्च कमी झाला आहे. यात ऑफिसला येण्याजाण्याचा खर्च आणि ऑफिसमधील खर्चातून सुटका मिळाली आहे. जर तुम्ही वर्क फॉर्म होममुळे दरदिवशी 200 रुपयांची बचत करत असाल आणि हेच पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुमची गुंतवणूक आणि बचत दोन्हीही वाढू शकते.

दीड लाखांपर्यंत पैशांची बचत

समजा तुम्ही ऑफिसला असताना दरदिवशी 200 रुपयांचा खर्च करत असाल, तर तुम्ही महिन्याला 6000 रुपये खर्च करता. मात्र घरातून काम केल्याने तुमचा हा खर्च वाचतो. तसेच जे कोणी ऑफिसमध्ये जेवण करत असतील त्यांचे यापेक्षाही जास्त पैशांची बचत करता येऊ शकते. त्यानुसार जर वर्षभर वर्क फॉर्म होम सुरु राहिले तर तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत पैशांची बचत करु शकता.

बचत कशी होणार?

जर आपण दर महिन्यात होणारा खर्च वाचवून SIP मध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला फायदे मिळू शकतो. जर तुम्ही दरमहिना एसआयपी म्हणून 6 हजार रुपये जमा केले तर काही महिन्यात तुम्ही 1 लाख 90 हजार रुपयांची बचत होईल. भारतीय स्टेट बँकेच्या एमएफ काऊंटरच्या अंदाजानुसार तुम्ही 1 लाख 60 हजार रुपयांची बचत करू शकता.

दरम्यान SBI, HDFC, ICICI, BOB, PNB यांसारख्या अनेक बँका 5.8 व्याज देतात. तर उत्कर्ष किंवा इत्यादी बऱ्याच छोट्या बँका या 8 टक्के आणि जन स्मॉल फायनान्स बँक 7 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. ही स्कीम 24 महिन्यांच्या आधारे केली जाते. तसेच जर तुम्ही वर्षभर हे पैसे गुंतवलात तर तुम्हाला दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळते. यातून तुम्ही एखादा स्मार्ट टीव्हीही खरेदी करु शकता.  (Working From Home Can Save Your Money)

संबंधित बातम्या : 

पोस्टाची भन्नाट योजना, 10 हजारांची गुंतवणूक करुन 16 लाखांपेक्षा जास्त नफा मिळवा

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय, जाणून घ्या या 4 गोष्टी, नेहमीच कमवाल नफा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें