Special Trains | आता ट्रेनमध्ये मिळणार मसाज आणि शॉवरची सुविधा, पर्यटकांसाठी भारतीय रेल्वेच्या विशेष गाड्या!

आयआरसीटीसीने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात आणखी दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Special Trains | आता ट्रेनमध्ये मिळणार मसाज आणि शॉवरची सुविधा, पर्यटकांसाठी भारतीय रेल्वेच्या विशेष गाड्या!
आयआरसीटीसीमार्फत चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांना पर्यटकांची मोठी पसंती मिळते.
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 12:43 PM

मुंबई : कोरोना विषाणूने देशभरातच नव्हे तर अवघ्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या भीतीने लोक अद्याप लांबचा प्रवास करणे टाळत आहेत. काही लोकांनी तर प्रवास करणेच सोडून दिले आहे. तथापि, आता कोरोनाची परिस्थिती आधीपेक्षा थोडी सुधारली आहे. कोरोनाकाळात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायांप्रमाणेच पर्यटन उद्योग देखील पूर्णपणे उध्वस्त झाला होता. परंतु. आता भारतीय रेल्वे हळूहळू पुन्हा एकदा रुळावर येत आहे. अनलॉकनंतर ट्रॅकवर उतरणाऱ्या विशेष गाड्यांमधूनही याची झलक पाहायला मिळते आहे (IRCTC Special train for jyotirlinga and statue of unity tour shower and massage facility).

आयआरसीटीसीमार्फत चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांना पर्यटकांची मोठी पसंती मिळते. पर्यटकांचा हाच कल लक्षात घेऊन आयआरसीटीसीने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात आणखी दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन ज्योतिर्लिंग आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी, चंडीगड येथून धावतील. याशिवाय ‘पधारो राजस्थान’ या ट्रेनची= यात्रा दिल्लीतील सफदरजंग येथून सुरू होईल.

मोजावे लागेल ‘इतके’ भाडे

ज्योतिर्लिंग आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी ही विशेष ट्रेन 12 फेब्रुवारीला चंदीगडहून सुटेल आणि महाकालेश्वर व ओंकारेश्वर मंदिरांना पहिली भेट देईल. ही प्रथम श्रेणीची वातानुकूलित ट्रेन असून, यातून प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला तब्बल 26,790 रुपये मोजावे लागणार आहेत. यासह, आपण या प्रवासात स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील पाहू शकाल. तर, 12 फेब्रुवारीला ‘पाधारो राजस्थान’ ही विशेष ट्रेन दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून सुटेल (IRCTC Special train for jyotirlinga and statue of unity tour shower and massage facility).

चार रात्र आणि पाच दिवसांच्या या प्रवासामध्ये पर्यटक जैसलमेर आणि जोधपूरला भेट देऊ शकतील. या द्वितीय श्रेणी वातानुकूलित कोचच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशी भाडे 22, 380 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. या दोन गाड्यांच्या तिकीट रकमेमध्ये जेवण, हॉटेलमध्ये मुक्काम आणि रेल्वे स्थानक ते पर्यटन स्थळांपर्यंतची वाहतूक सुविधा, याचबरोबर प्रवासी विमा या गोष्टींचा समावेश आहे. या विशेष प्रवासावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचेही पूर्ण पालन केले जाणार आहे.

ट्रेनमध्ये मसाजची सुविधा उपलब्ध होणार!

भारतीय रेल्वेच्या या विशेष गाड्यांमध्ये आधुनिक पँट्री कार, दोन भोजनालय, कोचमध्ये शॉवरसह स्नानगृह, सेन्सर आधारित शौचालय आणि फूट मसाजची सुविधा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कोचमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासह कोचमध्ये सुरक्षारक्षकही तैनात केले जाणार आहेत.

(IRCTC Special train for jyotirlinga and statue of unity tour shower and massage facility)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.