हे तीन ड्रायफ्रूट्स खा भिजवून , शरीराला मिळतील सॉलिड फायदे
ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. ड्रायफ्रुट्स रोज खाल्ल्याने शरीरात जीवनसत्वे, खनिजे आणि सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता होत नाही. पण तज्ञांच्या मते ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ल्यास त्याचे आरोग्याला जास्त फायदे होतात.

हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रुट्स खाणे अनेक जणांना आवडते. थंडीमध्ये ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते ड्रायफ्रुट्स हा एक असा पदार्थ आहे ज्याचे सेवन केल्यानंतर शरीराला जीवनसत्वे, खनिजे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात. पण ड्रायफ्रुट्स भिजवून खावे असे तज्ञ सांगतात. पोषणतज्ञ नमामि अग्रवाल म्हणतात की काही लोक स्नॅक्स म्हणून ड्रायफ्रुट्स खातात तेही भिजवल्याशिवाय पण यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊ शकते. त्यांच्या म्हणण्यानुसार ड्रायफ्रुट्स पाण्यात, दुधात किंवा मधात भिजवून खाल्ल्यास त्यातील सर्व पोषक घटक सक्रिय होतात. तज्ञांनी तीन ड्रायफ्रुट्स बद्दल सांगितले आहे जे भिजवल्यानंतर खाल्ल्यानेच त्याचा फायदा होतो.
अक्रोड
अक्रोडाचे फायदे सर्वांना माहिती आहेत. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. मेंदूच्या विकासासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड खूप महत्त्वाचे आहे. त्यात अँटिऑक्सिडेंटही आढळतात. जर तुम्ही ते भिजवून खाल्ले तर त्यातील फायबर आणि इतर पोषक तत्वांचा दर्जा सुधारतो. यामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही.
बदाम
बदाम देखील उष्ण असतो. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. जर तुम्ही बदाम रात्रभर भिजवून खाल्ले तर त्यात असलेले एन्झाईम्स आणि अँटिऑक्सिडंट्स आधीच सक्रिय होतात. यामध्ये असलेले आहारातील फायबर तुमच्या पचनसंस्थेसाठी अधिक फायदेशीर ठरतात.
मनुके
मनुक्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. भिजवल्यानंतर मनुके खाल्ल्याने त्याचे आरोग्याला मोठ्या प्रमाणात फायदे होतात. काही लोक ते भिजवल्याशिवाय खातात परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यास हानी पोहोचू शकते. मनुके भिजवल्यानंतर त्याची चव वाढते आणि त्यातील जीवनसत्वे तसेच खनिजांची पातळी वाढते.
पचनसंस्थेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी भिजवलेले मनुके खाणे खूप फायदेशीर आहे. परंतु तज्ञ असे म्हणतात की जर एखाद्याला ड्रायफ्रुट्सची ॲलर्जी असेल तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते खाऊ नये.