निरोगी राहण्यासाठी ‘या’ जपानी सवयींचं करा पालन आणि जगा आनंदी आयुष्य

जपानमध्ये असंख्य लोक निरोगी आयुष्य जगतात, त्यामागे कारण देखील तसं आहे. जापानी लोक काही अशा नियमांचं पालन करतात, जे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात... तर जाणून घ्या कोणते आहेत 'ते' नियम...

निरोगी राहण्यासाठी या जपानी सवयींचं करा पालन आणि जगा आनंदी आयुष्य
| Updated on: Jun 16, 2026 | 2:25 PM

जपान येथील लोक कायम स्वतःच्या आरोग्याबद्दल जागृत असतात. ज्यामुळे ते निरोगी आयुष्य जगतात. निरोगी राहण्यासाठी तुम्ही देखील काही सवयींचं पालन केल्यास आनंदी आयुष्य नक्कीच जगाल… सांगायचं झालं तर, जपान हा एक असा देश आहे जो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद, शांती आणि स्थिरतेसाठी ओळखला जातो. येथील लोक निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून निरोगी आयुष्य जगतात. या लहान आणि प्रभावी आरोग्यदायी सवयी अंगीकारून, तुम्हीसुद्धा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकता. तर जाणून घ्या जपानी लोक का निरोगी राहतात…

पौष्टिक आहार : जपानी लोक कायमच पौष्टिक आहार घेतात. त्यांच्या जेवणात प्रामुख्याने भात आणि हिरव्या भाज्या, भाजलेले व वाफवलेले पदार्थ असतात. असे पदार्थ पचायला सोपे असतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात. याव्यतिरिक्त, येथील लोक अधिक प्रमाणात स्थानिक, घरगुती, रसायनमुक्त आणि नैसर्गिक पदार्थांचे सेवन करतात.

वज्रासनात बसून जेवणे: जमिनीवर वज्रासनात बसून जेवणे ही जपानी लोकांची एक अनोखी प्रथा आहे. यामुळे त्यांची पचनक्रिया सुधारते आणि गॅस, आम्लपित्त व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या टाळता येतात. तसेच, वज्रासनामुळे पाठीचा कणा सरळ राहतो.

रात्रीचं जेवण लवकर करणं : तज्ज्ञ नेहमी रात्रीचं जेवण लवकर करण्याची सल्ला देतात. ही एक चांगली सवय आहे. जपानमधील बहुतेक लोक या सवयीचं पालन करतात. ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीचं जेवण करतात, जी एक अतिशय आरोग्यदायी पद्धत आहे. यामुळे शरीराला रात्रीच्या वेळी विषमुक्त होण्यासाठी आणि स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. ही सवय अंगीकारल्याने तुम्हाला निरोगी राहण्यासही मदत होईल.

ग्रीन टीचे सेवन: जपानमध्ये ग्रीन टी मोठ्या प्रमाणावर प्यायली जाते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. ग्रीन टी प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे, आपल्या दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश केला पाहिजे.
चालणे आणि सायकलिंग: जपानी लोक अन्न पचनासाठी चालतात आणि सायकल चालवतात. यामुळे त्यांना अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि आजार दूर राहतात. शिवाय, यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासही मदत होते.

योग, ध्यान आणि चांगली झोप: दररोज थोडा योग करा, काही मिनिटे ध्यान करा आणि पुरेशी झोप घ्या. या सवयी तुम्हाला तणाव, नैराश्य आणि आजारांपासून दूर ठेवतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मित्रांसोबत आठवड्यातून एकदा तरी भेटा. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहिल.

Follow Us