
जेव्हा आपण चपात्या करतो तेव्हा त्या अगदीच थोड्या वेळानंतर त्या कडक होऊ लागतात. पण वेळेआभावी कधी कधी ताज्या चपात्या बनवणं शक्य नसतं म्हणून आपण जास्तच चपात्या बनवून ठेवणे सोपे होते. पण चपाती बनवून बाजूला ठेवल्या तर त्या थोड्याच वेळात कडक होतात. अशावेळी त्या चपात्या खाणे कठीण असतात आणि त्यांची चव चांगली नसते.
मग अशा परिस्थितीत चपात्या कडक होऊ नये यासाठी एक भन्नाट ट्रीक आहे. ही ट्रीक DedecorDiaries नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, हा हॅक किंवा ट्रीक किती प्रभावी आहे आणि किती नाही हे तुम्ही सहजपणे पाहू शकता. चपाती मऊ ठेवण्यासाठी, तुम्हाला फक्त ही एक गोष्ट चपातीच्या बॉक्समध्ये किंवा टोपल्यात ठेवावी लागेल.
चपात्या मऊ ठेवण्याची एक भन्नाट ट्रीक
पोळ्या मऊ ठेवण्यासाठी, पोळ्या तयार करा आणि नंतर त्या चपात्यांच्या बॉक्समध्ये किंवा टोपल्यात एक तुकडा ठेवायचा आहे. हा तुकडा म्हणजे आल्याचा. होय, हाच तो हॅक आहे ज्यामुळे चपात्या करून ठेवल्यानंतरही त्या कडक होणार नाही आणि बऱ्याच वेळापर्यंत मऊ राहतील. बरं या हॅकशिवाय अजूनही असे काही अशा छोट्या-छोट्या ट्रीक आहेत ज्याचा वापर करून आपण चपात्या मऊ ठेवू शकतो.
अशा काही ट्रीक ज्यामुळे चपात्या मऊ राहू शकतात
चपाती बनवल्यानंतर लगेच त्यावर तूप किंवा बटर लावल्याने चपाती मऊ राहते. यामुळे चपातीचा मऊपणा टिकून राहतो आणि त्याची चवही वाढते.
तसेच चपाती ठेवण्यासाठी नेहमी स्वच्छ सुती कापड वापरा आणि त्यात चपात्या झाकून ठेवा. यामुळे चपाती कडक होणार नाहीत.
पीठ मळताना हे हॅक्स नक्की वापरून पहा
जर पीठ व्यवस्थित मळले तर पोळ्याही मऊ होतता. पीठ मळताना तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. जर पीठ कोमट पाण्याने मळले तर या पीठापासून बनवलेल्या पोळ्या मऊ होतात. पीठ जर नीट मळलेले नसेल तर त्याच्या पोळ्या देखील कडक होतात. म्हणून पीठ जास्त घट्ट मळू नये.
पीठ मळताना काय काळजी घ्यावी?
तसेच पीठ मळताना थोडे तूप किंवा तेल घालून मळले तर पीठ मऊ होते. पीठ मळल्यानंतर, ते काही वेळ झाकून ठेवू शकतो. पीठ झाकण्यासाठी हलके ओले कापड वापरले तरी चालेल. फक्त त्या कापडात जास्त पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा ते पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे या पिठाच्या पोळ्याही लाटताना त्रास होईल तसेच त्यांची चवही बिघडेल.