मिठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवल्यास काय होते? अंधश्रद्धा नाही तर हे नुकसान होण्यापासून वाचाल

अनेकजण धान्यात किंवा पिठाच्या डब्यात तेजपत्ता किंवा लिंबाची साल वैगरे असे अनेक गोष्टी ठेवतात पण. मिठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवली तर काय होईल माहितीये? फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

मिठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवल्यास काय होते? अंधश्रद्धा नाही तर हे नुकसान होण्यापासून वाचाल
Keep Salt Dry, Neem Leaves in Salt Container Prevent Spoilage
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2025 | 5:04 PM

पावसाळ्यात सर्वात जास्त समस्या जाणवते ती म्हणजे किचनमध्ये. कारण साखर, मीठ अशा पदार्थांना पाणी सुटतं. तसेच धान्य खराब होण्याची शक्यता असते. पण किचनमधील काही गोष्टींमधूनच हे नुकसान होण्यापासून आपण वाचवू शकतो. जसं तुम्हीही हे पाहिलं असेल की आपली आई- आजी पूर्वी मसाल्यांच्या डब्यात किंवा धान्यांच्या डब्यात कडुलिंबाचा पाला किंवा मिठाच्या डब्यात लवंग किंवा तमालपत्र ठेवत असत. ही काय अंधश्रद्धा नाही पण अन्नपदार्थ दीर्घकाळ साठवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. त्याचप्रमाणे, मिठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कसे ते जाणून घेऊयात.

कडुलिंबाची पाने मिठाच्या डब्यात ठेवण्याचे फायदे

आपण मिठाचा डबा जास्त वेळ बंद ठेवतो तेव्हा तो खराब होऊ लागतो. दुसरीकडे, जर आपण मिठाचा डबा उघडा ठेवला तर मीठ ओलावा आणि हवेच्या संपर्कात येते आणि त्यात गुठळ्या तयार होतात. कधीकधी ओलाव्यामुळे किंवा मीठ जास्त जुने झाल्यामुळे मिठात बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढू शकतात. अशा परिस्थितीत, जर कडुलिंबाची पाने मिठाच्या डब्यात ठेवली तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कडुलिंबाची पाने मीठाच्या डब्याक ठेवल्याने….

कडुलिंबाच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असल्याने, ते मीठाच्या डब्यात ठेवल्याने मिठात गाठी तयार होत नाहीत आणि मिठात बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढत नाहीत. कडुलिंबाची पाने त्यांना वाढू देत नाहीत. जेव्हा कडुलिंबाची पाने मीठाला ओलावा शोषण्यापासून रोखतात, तेव्हा ते मीठ थोडेसे कोरडे होते आणि लवकर खराब होत नाही. याशिवाय, कडुलिंबाच्या पानांचा थोडासा कडूपणा आणि तीव्र वास देखील कीटकांना मीठापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

मीठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने कशी साठवायची?

यासाठी ताजी आणि कोरडी कडुलिंबाची पाने घेऊन ती स्वच्छ करावीत. कारण ओल्या पानांमुळे ओलावा अजून वाढू शकतो, ज्यामुळे मीठ खराब होऊ शकते. फक्त चांगली, हिरवी आणि पूर्णपणे वाळलेली पानेच वापरावी. तुम्ही पाने धुवून उन्हात चांगली वाळवू शकता. पाने पूर्णपणे सुकल्यानंतर, त्यांना थेट मिठाच्या डब्यात ठेवा. पाने मिठाच्यावर ठेवून द्या किंवा मिठाच्या आत ठेवून द्या. किंवा तुम्ही ही पाने एका लहान जाळीदार पिशवीत ठेवून मग ती डब्यात ठेवू शकता.

पावसाळ्यात हा उपाय तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल.

मीठाच्या प्रमाणासाठी 4 ते 5 पाने पुरेशी आहेत. ही पाने त्यांच्या सुगंधाने आणि गुणधर्मांनी मीठाला ओलावा आणि किटकांपासून वाचवतात. पण ही पाने दर 15-20 दिवसांनी बदलली पाहिजेत जेणेकरून ती ताजी राहतील आणि त्यांचे काम योग्यरित्या करत राहतील. अशापद्धतीने तुम्ही मीठ खराब होण्यापासून, ओलावा धरण्यापासून वाचवू शकाल. हा उपाय तुम्ही कधीही कोणत्याही
ऋतुत करू शकता. पण विशेषत: पावसाळ्यात हा उपाय तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल.