AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ‘हा’ आजार; सतत झोपून राहावसं वाटतं, ही लक्षणे तुम्हाला पण जाणवतात का?

महिलांमध्ये सतत थकवा येण्याची किंवा झोपून राहावसं वाटण्याची समस्या जाणवत असेल तर नक्कीच त्यांना या आजाराची लक्षणे असण्याची शक्यता आहे. आणि हा आजार म्हणजे महिलांचा सर्वात मोठा शत्रू म्हटलं जातं त्यामुळे महिलांना इतर बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं.

महिलांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे 'हा' आजार; सतत झोपून राहावसं वाटतं, ही लक्षणे तुम्हाला पण जाणवतात का?
Iron Deficiency in Women, 3 Signs You Shouldn't IgnoreImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2025 | 7:32 PM
Share

जसजशी जीवनशैली बदलतेय तसतसं आजारांचं प्रमाणही वाढलं आहे. विशेषत: महिलांमध्ये. महिलांमध्ये अनेक आजारांचा धोका दिसू लागला आहे. महिलांना ऑस्टियोपोरोसिस, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि ऑटोइम्यून आजारांबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांना एका आजाराची सर्वाधिक शक्यता असते. हा आजार 15 ते 49 वयोगटातील महिलांना होण्याची शक्यता असते. त्यांना याबाबत खूप काळजी घ्यावी लागते.

15 ते 49 वयोगटातील सुमारे 30 टक्के महिला आणि 37 टक्के गर्भवती महिलांना हा त्रास  

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते , 15 ते 49 वयोगटातील सुमारे 30 टक्के महिला आणि 37 टक्के गर्भवती महिलांना अशक्तपणाचा त्रास होतो. मासिक पाळी आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच लोहाची कमतरता आढळते जी अशक्तपणाचे मुख्य कारण बनते. शरीरात रक्ताची कमतरता खूप धोकादायक असू शकते आणि ती सर्व ऊर्जा त्यामुळे निघून जाते.

महिलांना लगेच थकवा येणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटते

परिणामी थोडं जरी काम केलं तरी देखील काही महिलांना लगेच थकवा येणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटते. त्यामुळे त्यांना नेहमीच बेडवर किंवा सोफ्यावर झोपावे किंवा बसावेसे वाटते. तज्ज्ञांच्या मते लोहाच्या कमतरतेची 3 गंभीर लक्षणे असतात. जी कधीकधी डॉक्टर देखील ओळखू शकत नाहीत. ती कोणती तीन लक्षणे आहेत जाणून घेऊयात.

फेरिटिन चाचणी महत्त्वाची आहे

बहुतेक डॉक्टर जेव्हा ही 3 लक्षणे दिसतात तेव्हा लोह पातळी म्हणजे आर्यन लेवलची चाचणी करायला सांगतात परंतु याने आपण लोहाच्या कमतरतेची सुरुवात ओळखू शकत नाही. कधीकधी लोहाची पातळी योग्य असते, परंतु फेरिटिनची पातळी बिघडते. हे एक प्रथिन आहे जे शरीरात लोह साठवते. त्याच्या कमतरतेमुळे देखील ही लक्षणे दिसून येतात.

आर्यनच्या कमतरतेमुळे काय होते?

शरीरात पुरेसे लोह नसल्याने त्याची कमतरता निर्माण होते. लोह लाल रक्तपेशी तयार करण्यास खूप मदत करते. या लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेते. अर्थात, लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन देखील कमी होईल आणि लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा निर्माण होईल.

तीव्र थकवा

जर एखादी महिला नेहमी थकलेली असेल आणि तिला झोपून राहावेसे वाटत असेल, तर तिच्यात लोहाचे प्रमाण कमी असू शकते. बऱ्याचदा हे लक्षण ओळखता येत नाही. डॉक्टर म्हणतात की कमी ऊर्जा ही दीर्घकालीन थकव्यामुळे होऊ शकते, जी स्वतःच अनेक धोकादायक समस्यांचे लक्षण आहे. कधीकधी हे जास्त ताण घेतल्याने किंवा झोपेचा अभाव यामुळे देखील होऊ शकते.

डोके दुखणे किंवा चक्कर येणे

आर्यनच्या किंवा पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे चक्कर येण्याची तक्रार उद्भवते. उभे राहून किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करताना हे सहसा जास्त होते. हे कमी हिमोग्लोबिनचे लक्षण असू शकते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.

हात-पाय थंड पडणे

हे लक्षण महिलांमध्ये खूप सामान्य आहे. त्यांचे हात किंवा पाय थंड पडतात. हात आणि पायांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नसल्याने त्यांना हा त्रास होऊ शकतो. तसेच हे शरीरात आर्यन कमी असल्याचंही लक्षण आहे.

जर तुमच्यातही ही 3 लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपचार न करता किंवा न टाळता डॉक्टरांना नक्की दाखवा आणि त्यांचा सल्ला घ्या तसेच त्यांच्या

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.