AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळ्या तीळाचे खास पेय प्या आणि झटपट वजन कमी करा, जाणून घ्या अधिक!

काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळे तीळ स्वयंपाकघरात मसाल्याच्या रूपात वापरले जातात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळ्या तीळाचे खास पेय प्या आणि झटपट वजन कमी करा, जाणून घ्या अधिक!
खास पेय
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 03, 2021 | 7:13 AM
Share

मुंबई : काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळे तीळ स्वयंपाकघरात मसाल्याच्या रूपात वापरले जातात. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे वाढलेले वजन कमी करण्यासाठी काळे तीळ अत्यंत फायदेशीर आहेत. (black sesame beneficial for weight loss)

आपण जर दररोज काळ्या तिळाचे खास पेय सकाळी रिकाम्या पोटी घेतले तर आपले वजन झटपट कमी होईल. हे खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला चार चमचे काळे तीळ रात्री पाण्यात भिजवावे लागतील. त्यानंतर सकाळी त्या तीळातील पाणी काढा आणि एक ग्लास पाण्यामध्ये हे तीळ टाका आणि मंद आचेवर पाणी उकळूद्या. साधारण दहा मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या आणि गरम असतानाच प्या. यामुळे शरीरावरील चरबी जाण्यास मदत होईल.

हे पाणी आपण दररोज सकाळी पिले पाहिजे आणि पाणी पिल्यानंतर शक्य असेल तर व्यायामही केला पाहिजे. काळे तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला काळ्या तिळात लिंबू मिक्स करून उन्हात ठेवावे लागेल. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ खा. यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.दोन ते तीन ग्रॅम काळे तीळ दररोज खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढतात. याशिवाय दमा आणि खोकल्याच्या समस्या कमी करण्यासाठी काळे तीळ फायदेशीर आहेत.

काळ्या तिळाचे नियमितपणे सेवन केल्याने आपली दृष्टी चांगली होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त ज्यांना डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असते त्यांनाही आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केला पाहिजेत. काळे तीळ हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. जर दररोज सुमारे 10 ते 12 काळे तीळ गाईच्या किंवा बकरीच्या दुधासह घेतल्यास हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो आणि बीपी नियंत्रित राहतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(black sesame beneficial for weight loss)

Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?