सर्व प्रकारचे चहा ट्राय केलेत… आता असा बनवा लवंग चहा, वजनही येईल नियंत्रणात

सर्व प्रकारचे चहा ट्राय केलेत... आता असा बनवा लवंग चहा, वजनही येईल नियंत्रणात
Clove Tea

लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल असे अनेक गुणधर्म असतात. जर आपण नियमित लवंगाचा चहा पिण्याची सवय लावली तर सर्दी- खोकल्यासह सर्व समस्यांपासून सहज बचाव होतो. यातून आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 29, 2022 | 1:30 PM

आतापर्यंत आपण काळा चहा, ग्रीन टी, लेमन टी यासह विविध प्रकारच्या चहांची चव घेतली आहे. यातून शरीराला मिळणारे फायदेही आपण पाहिले तसेच अनेकांनी अनुभवलेही असतील. विशेषत: कारोना काळात अनेकांनी रोगप्रतिकाशक्ती वाढविण्यासाठी विविध काढेदेखील घेतले. परंतु आज आपण अशा चहाबद्दल चर्चा करणार आहोत ज्यातून एक नव्हे तर अनेक फायदे शरीराला होतील. लवंगपासून तयार केलेल्या चहापासून (Clove Tea) शरीराला अनेक चमत्कारीत फायदे होतात. हिवाळ्यातील सर्दी- खोकल्यापासून ते अगदी वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदे लवंग चहाचे आहेत. लवंगच्या चहाचे नियमित सेवन केल्यास अनेक संधीसाधू आजारांपासून लांब राहता येते. (Benefits of Clove Tea) लवंगात  अनेक औषधी घटक आहेत. तसेच अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असल्याने यातून आपली रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत असते. लवंग चहा बनवण्यासाठी दूधाची गरज नाही. अगदी सोप्या पध्दतीने लवंग चहा तयार होतो.

लवंग चहाचे फायदे

1) हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी लवंग अत्यंत प्रभावी ठरते. लवंगच्या नियमित सेवनामुळे घसा खवखवणे, जळजळ होणे, खोकला, सर्दी यापासून आराम मिळतो.

2) लवंगात अँटि-ऑक्सिडेंट असतात जे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.

3) वजन कमी करायचे असेल तर लवंगाचा चहा मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो.

4) लवंगाचा चहा नियमित घेतल्यास शरीरातील पचनक्रिया सुधारते

5) शरीर उर्जावान व तंदुरुस्त ठेवण्यासाठी लवंग प्रभावी ठरते.

6) दात दुखत असतील, हिरड्यांना सूज येत असेल तर त्यावरही लवंगाचा चहा प्रभावी काम करतो.

7) लवंग चघळल्याने किंवा तीचा चहा केल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात.

8) लवंग चहाने त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

असा बनवा लवंग चहा

लवंग चहा बनवण्यासाठी दीड कप पाण्यात दोन लवंग बारीक करुन उकळी द्यावी नंतर कपमध्ये राहू द्या. यानंतर, गॅस बंद करा आणि एक मिनिट हे मिश्रण प्लेटने झाकून ठेवा. यानंतर चहा गाळून त्यात एक चमचा मध मिसळा. त्यानंतर चहा प्या.
दरम्यान, सकाळ हा चहा पिल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. तसेच या चहाचा वापर जास्त प्रमाण करणेही टाळले पाहिजे. लवंग हा उष्ण घटक असल्याने जास्त सेवनही अपायकारक ठरु शकते.

इतर बातम्या:

इतर बातम्या: 

Travel Special|स्वर्गाहून सुंदर, जगातील सर्वात उंच शिवमंदिर, उत्तरांचलच्या कुशीत वसलेले चोपता हिलस्टेशन

बॉडी शेव्हिंग केल्यावर त्वचा कोरडी होते? नितळ त्वचेसाठी हे उपाय ठरतील फायदेशीर…

clove tea provides all health benefits, know ots benefits from cold cough to weight loss and recipe

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें