Weight Loss : ‘या’ स्वादिष्ट आणि निरोगी भाज्या वजन कमी करण्यास मदत करतात, वाचा अधिक!

| Updated on: Dec 10, 2021 | 9:36 AM

आपण जो आहार दररोज घेतो. त्यामध्ये भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतीय जेवणाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात विविध प्रकारच्या भाज्या असतात. या भाज्या तेल तूप किंवा बटरने बनवल्या जातात. त्यात विविध प्रकारचे भारतीय मसालेही टाकले जातात.

Weight Loss : या स्वादिष्ट आणि निरोगी भाज्या वजन कमी करण्यास मदत करतात, वाचा अधिक!
आहारातील भाज्या
Follow us on

मुंबई : आपण जो आहार दररोज घेतो. त्यामध्ये भाज्यांचा (vegetables) समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतीय जेवणाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात विविध प्रकारच्या भाज्या असतात. या भाज्या तेल तूप किंवा बटरने बनवल्या जातात. त्यात विविध प्रकारचे मसालेही टाकले जातात. म्हणूनच ते स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनतात. भाज्या पचनास मदत करतात, रक्त परिसंचरण सुधारतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करतात.

-आपण भाज्या तयार करताना तेल, तूप किंवा बटर यांच्या वापर करतो. यामुळे कॅलरीजची संख्या चांगलीच वाढते. यामुळे वजन कमी करायचे आहे. असे लोक भाज्या खाणे टाळतात. मात्र, निरोगी राहण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये भाज्या असणे खूप महत्वाचे आहे. मशरूम हेल्दी असतात आणि त्यात खूप कमी कॅलरी असतात. त्यात क्रीम घालणे टाळा आणि कॅलरी बर्न करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही ते रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात सहज खाऊ शकता.

-जर तुम्हाला भाज्या आवडत असतील तर फुलकोबीची भाजी तुमच्यासाठी चांगली आहे. फुलकोबीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. भाज्यांमधील अँटिऑक्सिडंट अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. हे पचन, पाचक आरोग्य राखण्यासाठी मदत करते.

-भारतात अनेक प्रकारचे कडधान्ये उपलब्ध आहेत. दररोजच्या आहारामध्ये विविध डाळींपासून वरण तयार करावे आणि त्याचा आहारात समावेश करावा. कडधान्ये प्रथिने आणि पौष्टिक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समृद्ध स्रोत आहेत. डाळींचा आहारात समावेश करणे म्हणजे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करणे, मधुमेह टाळणे, कडधान्ये पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. विशेष म्हणजे दररोजच्या आहारामध्ये वरणाचा समावेश केला तरी देखील वजन वाढत नाही.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..